मतदान मोजणी केंद्राला छावणीचे स्वरूप
By Admin | Updated: October 16, 2014 23:19 IST2014-10-16T23:19:50+5:302014-10-16T23:19:50+5:30
काल बुधवारला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशिनस चोख बंदोबस्तात तुमसर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीत असलेल्या मतमोजणी केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर निवडणूक

मतदान मोजणी केंद्राला छावणीचे स्वरूप
तुमसर : काल बुधवारला झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर ईव्हीएम मशिनस चोख बंदोबस्तात तुमसर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या ईमारतीत असलेल्या मतमोजणी केंद्रात आणण्यात आले. त्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी केंद्राला सील करण्यात आले.
तुमसर विधानसभा क्षेत्रातील ३५१ मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया शांततामय वातावरणात आटोपली. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्य चोखपणे बजावल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अशोक लटारे यांनी सांगितले. ३५१ मतदान केंद्रासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दोन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
विटपूर, सुसुरडोह आणि मोहगाव देवी येथील ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंडामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाली. विटपूर येथील एका मतदाराने बहिष्कार झुगारून मतदान केले. तर मोहोगाव देवी येथील ११ मतदारांनी मतदान केले. सहायक निवडणूक अधिकारी सचिन यादव व निवडणूक अधिकारी अशोक लटारे यांनी या तिन्ही गावात जावून गावकऱ्यांना मतदान करण्यासाठी चर्चा केली. परंतु गावकऱ्यांनी सहकार्य केले नाही.
मतदान प्रक्रियेनंतर रात्री १ वाजेपर्यंत मतदान केंद्रनिहाय आकडेवारी गोळा करण्यात आली. पावसाळी वातावरण असल्यामुळे वाटरफ्रुप मंडप टाकण्यात आले आहे. देव्हाडी येथील मतदान केंद्रावर मशिनिची बॅटरी खराब झाल्याने काही वेळेपर्यंत धांदल उडाली होती. त्यानंतर तातडीने नवीन मशिन लावून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
तुमसर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणी होणार असून, याठिकाणी सैन्यदलाचे जवान तैनात करण्यात आले आहे. यामुळे आयटीआयला छावणीचे स्वरूप आले आहे. (तालुका प्रतिनिधी)