शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

नैसर्गिक, विषमुक्त शेतीची गरज

By admin | Updated: February 14, 2016 00:41 IST

कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी विविध मार्गाने हवालदिल झालेला आहे. मुळ कारणाच्या खोलात गेले असता रासायनिक व सेंद्रीय शेती हे कारण आढळते.

ठाणा येथे निवासी शेतकरी शिबिर : पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे प्रतिपादनजवाहरनगर : कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी विविध मार्गाने हवालदिल झालेला आहे. मुळ कारणाच्या खोलात गेले असता रासायनिक व सेंद्रीय शेती हे कारण आढळते. किंबहुना हे विदेशी षडयंत्र आहेच. शेतकऱ्यामधील सेंद्रीय शेतीरूपी भुत नाहीसा झाला पाहिजे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक, आध्यात्मिक व विषमुक्त शेतीची गरज आहे, असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंंत्रणा, कृषी अधिक्षक कार्यालय, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि स्वयंसेवी संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलपंप येथील बावनकुळे सभागृहात चार दिवसीय शेतकरी शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे, सहायक महाव्यवस्थापक (नाबार्ड) अरविंद खापर्डे, प्रगतशील शेतकरी डॉ.संजय एकापुरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, एकुण उत्त्पन्नाच्या ६० टक्के खर्च कृषी विषय बाबीसाठी होत नाही. असमानी संकटामुळे शेतकरी त्रस्त होत आहे. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहे. ‘शॉर्टकट’ व ‘लाँगकट’. ‘शॉर्टकट’ मार्गाने गेल्यास जीवन चिरकाळ टिकत नाही, ‘लाँगकट’ मार्गाने गेल्यास दुरगामी पिकवाढीवर परिणाम होऊन शेतकऱ्याचे आणि पर्यायाने देशाचा विकास होतो. ठाणा येथील चार दिवसीय निवासी शेतकरी शिबिरात पदमश्री सुभाष पाळेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, परभणी, गोंदिया, भंडारा, वाशीम, छिंदवाडा, शिवनी, विशाखापट्टणम, रायपूर, बालाघाट येथील शेतीनिष्ठ असे पाचशेहून अधिक शेतकरी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित आहेत. प्रास्ताविक प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.संचालन अरविंद खापर्डे यांनी तर आभारप्रदर्शन पुनम खटावकर यांनी केले. (वार्ताहर)