नैसर्गिक, विषमुक्त शेतीची गरज
By Admin | Updated: February 14, 2016 00:41 IST2016-02-14T00:41:57+5:302016-02-14T00:41:57+5:30
कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी विविध मार्गाने हवालदिल झालेला आहे. मुळ कारणाच्या खोलात गेले असता रासायनिक व सेंद्रीय शेती हे कारण आढळते.

नैसर्गिक, विषमुक्त शेतीची गरज
ठाणा येथे निवासी शेतकरी शिबिर : पद्मश्री सुभाष पाळेकर यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी विविध मार्गाने हवालदिल झालेला आहे. मुळ कारणाच्या खोलात गेले असता रासायनिक व सेंद्रीय शेती हे कारण आढळते. किंबहुना हे विदेशी षडयंत्र आहेच. शेतकऱ्यामधील सेंद्रीय शेतीरूपी भुत नाहीसा झाला पाहिजे. जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक, आध्यात्मिक व विषमुक्त शेतीची गरज आहे, असे प्रतिपादन कृषितज्ज्ञ पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंंत्रणा, कृषी अधिक्षक कार्यालय, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) आणि स्वयंसेवी संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलपंप येथील बावनकुळे सभागृहात चार दिवसीय शेतकरी शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रज्ञा गोळघाटे, सहायक महाव्यवस्थापक (नाबार्ड) अरविंद खापर्डे, प्रगतशील शेतकरी डॉ.संजय एकापुरे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, एकुण उत्त्पन्नाच्या ६० टक्के खर्च कृषी विषय बाबीसाठी होत नाही. असमानी संकटामुळे शेतकरी त्रस्त होत आहे. जीवन जगण्याचे दोन मार्ग आहे. ‘शॉर्टकट’ व ‘लाँगकट’. ‘शॉर्टकट’ मार्गाने गेल्यास जीवन चिरकाळ टिकत नाही, ‘लाँगकट’ मार्गाने गेल्यास दुरगामी पिकवाढीवर परिणाम होऊन शेतकऱ्याचे आणि पर्यायाने देशाचा विकास होतो.
ठाणा येथील चार दिवसीय निवासी शेतकरी शिबिरात पदमश्री सुभाष पाळेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरासाठी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, परभणी, गोंदिया, भंडारा, वाशीम, छिंदवाडा, शिवनी, विशाखापट्टणम, रायपूर, बालाघाट येथील शेतीनिष्ठ असे पाचशेहून अधिक शेतकरी व महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित आहेत. प्रास्ताविक प्रज्ञा गोळघाटे यांनी केले.संचालन अरविंद खापर्डे यांनी तर आभारप्रदर्शन पुनम खटावकर यांनी केले. (वार्ताहर)