शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मुरूमासाठी नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

दावेझरी शिवारात नैसर्गिक टेकडी आहे. या टेकडीच्या एका बाजूला गिट्टी काढण्यासाठी परवानगी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला गट क्रमांक २६२ मध्ये मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. एक ते सात गटात उत्खननाची परवानगी असून प्रत्येक गटात केवळ ५०० ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवागनी आहे.

ठळक मुद्देदावेझरी येथील प्रकार : नियंत्रणाअभावी शासकीय मालमत्तेची लूट, पर्यावरणाचा ऱ्हास

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ता बांधकामासाठी लागणाऱ्या मुरूमाचे तालुक्यात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून आता कंत्राटदाराने नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. तालुक्यातील दावेझरी येथील नैसर्गिक टेकडी उद्ध्वस्त करून हजारो ब्रास मुरूमाची उत्खनन करण्यात आले. नियंत्रणाअभावी शासकीय मालमत्तेची लूट होत असताना यावर बोलायला कुणीही तयार नाही.दावेझरी शिवारात नैसर्गिक टेकडी आहे. या टेकडीच्या एका बाजूला गिट्टी काढण्यासाठी परवानगी गत अनेक वर्षांपासून केली जात आहे. टेकडीच्या दुसऱ्या बाजूला गट क्रमांक २६२ मध्ये मुरूम उत्खननाची परवानगी महसूल प्रशासनाने दिली आहे. एक ते सात गटात उत्खननाची परवानगी असून प्रत्येक गटात केवळ ५०० ब्रास मुरूम उत्खनन करण्याची परवागनी आहे. ६ डिसेंबर ते २५ जानेवारी या कालावधीत सातही गटातून मुरूमाचे उत्खनन करण्याची परवानगी दिली होती. शिवालय कंट्रक्शन कंपनीच्या नावाने ही परवानगी दिलेली आहे.मिटेवानी येथील गट क्रमांक ७६६ येथूनही ५०० ब्रास मुरूमाची परवानगी सदर कंपनीला देण्यात आली. या गटातूनही नियमबाह्य उत्खनन केले जात आहे.दावेझरी शिवारात एक मोठी टेकडी असून या टेकडीवर प्राचीन अवलीयाची समाधी आहे. तेवढा भाग सोडला तर आता संपूर्ण टेकडी उउद्ध्वस्त करण्यात आली आहे. अतिशय उच्च दर्जाचा मुरूम असल्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले.दावेझरी टेकडी ही शासनाच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष दिसत नाही. सर्व नियम पायदळी तुडवून ५० पट अधिक मुरूमाचे उत्खनन करण्यात आले आहे.चिंचोली-तुमसर रस्त्यावर मुरूमदावेझरी व मिटेवानी येथील उत्खनन केलेला मुरूम चिंचोली ते तुमसर रस्ता बांधकामासाठी वापरण्यात आला आहे. रस्ता हायब्रिड असल्याने पॉवर नियंत्रण करणारी स्वतंत्र एजन्सी आहे. स्थानिक बांधकाम विभाग त्याला जबाबदार नाही. मे गॉड ही एजन्सी यावर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती आहे. रस्त्यात किती मुरूम वापरला याची माहिती मिळाल्यास यातील अनियमितता पुढे येणार आहे.दावेझरी-मिटेवानी येथे मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात आली आहे. ३५०० ब्रासपेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन झाल्यास चौकशी करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास महसूल नियमानुसार कारवाई होईल.-गजेंद्र बालपांडे, तहसीलदार.चिंचोली-तुमसर दरम्यान रस्त्यावर किती मुरूमाचा वापर करण्यात आला. याची माहिती देण्यात येईल. सध्या मी बाहेर आहे. रस्त्याच्या मुरूमाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे.-राजेश खंडेलवाल, अभियंता मे गॉट एजन्सी.