साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 23:21 IST2019-06-26T23:21:07+5:302019-06-26T23:21:20+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.

Nationalist office bearers meeting at Sakoli | साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक

साकोली येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक

ठळक मुद्दे३० जूनला आयोजन : प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक ३० जून रोजी दुपारी १ वाजता साकोली येथील मंगलमृर्ती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या संदर्भात खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला मार्गदर्शन करणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज झाली असून भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. त्याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांची बैठक आयोजित आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आगामी विधानसभा निवडणुकी बाबत चर्चा करणार आहे. भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधानसभेसाठी इच्छुक उमदेवारांना अर्ज वितरण कार्यालयात सुरु केले आहे. १ जुलैपर्यंत पक्षाचे अर्ज मुंबई येथे पक्ष कार्यालयात पाठवायचे आहे. त्यासाठी इच्छुकांनी येथील जिल्हा परिषद मार्गावरील साईमंदिर जवळील राष्ट्रवादीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे यांनी केले आहे.

Web Title: Nationalist office bearers meeting at Sakoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.