लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : गत आठ महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यातील रेती घाट बंद आहेत, परंतु महसूल प्रशासनाने जप्त केलेली रेतीचा उपयोग राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात केला जात आहे. प्रती ब्रास दोन हजारांच्या भावाने कंत्राटदारांना रेती विक्री केली जाते. रेती घाटातून रेती साठा नदी काठावर केल्यानंतर महसूल प्रशासन धाड मारून कारवाई करीत आहे. रेती साठा झाल्यानंतर महसूल प्रशासनाला कशी जाग येते, हा संशोधनाचा विषय सध्या चर्चेत आहे.राज्य व राष्ट्रीय महामार्गाची बांधकामे सध्या सुरु आहेत. सीमेंट रस्ता बांधकाम तथा डांबरीकरणापूर्वी सीमेंट, रेती व गिट्टीचा थर राज्य मार्गावर घातला जातो. या दोन्ही कामांना सध्या जप्तीच्या रेतीचा मोठा आधार मिळत आहे. तुमसर तालुक्यातील बाम्हणी, सुकळी, डोंगरला व तामसवाडी येथील रेती साठ्यावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली. त्यानंतर रस्ता बांधकाम कंत्राटदाराला प्रती ब्रास दोन हजाराने रेती विक्री करण्यात आली. कंत्राटदारांचे काम येथे निघाले. राज्याला महसूल मिळाला असे चित्र येथे शासनदरबारी दाखविण्यात आले. असे असताना जिल्हा प्रशासन रेती तस्कारावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. रेती साठ्यााची चौकशी केल्यास सर्व पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.उत्खननादरम्यान कारवाई नाहीसदर रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती साठा करण्यात आला. नदीपात्रातून दिवसाढवळ्या रेती उत्खनन करण्यात आली. नदी काठावर मोठा रेती साठा जमा झाल्यानंतर महसूल प्रशासनाने धडक कारवाई करून रेती साठा जप्त केला. रेती उत्खनन ते कंत्राटदारापर्यंत येथे एक साखळी निर्माण झाल्याची माहिती आहे. कंत्राटदाराला नियमानुसार रेतीची टिपी आवश्यक आहे. चोरीच्या रेतीचा उपयोग करता येत नाही. त्याकरिता नियम आड येतो. त्यामुळे नियमात बसवून येथे कामे सुरु आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.रेती साठ्याची माहिती मिळाल्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली. रेती जप्त केल्यावर महसूल नियमानुसार त्याची विक्री एक ब्रास दोन हजार प्रमाणे करण्यात आली. एका बांधकाम कंत्राटदाराला ती देण्यात आली.- गजेंद्र बालपांडे,तहसीलदार, तुमसर.
जप्तीच्या रेतीने राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST
राज्य व राष्ट्रीय महामार्गाची बांधकामे सध्या सुरु आहेत. सीमेंट रस्ता बांधकाम तथा डांबरीकरणापूर्वी सीमेंट, रेती व गिट्टीचा थर राज्य मार्गावर घातला जातो. या दोन्ही कामांना सध्या जप्तीच्या रेतीचा मोठा आधार मिळत आहे. तुमसर तालुक्यातील बाम्हणी, सुकळी, डोंगरला व तामसवाडी येथील रेती साठ्यावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली. त्यानंतर रस्ता बांधकाम कंत्राटदाराला प्रती ब्रास दोन हजाराने रेती विक्री करण्यात आली.
जप्तीच्या रेतीने राष्ट्रीय, राज्य महामार्गाची कामे
ठळक मुद्देएक ब्रास रेतीची दोन हजाराला विक्री : साठा होतपर्यंत कारवाई नाही, साठ्यानंतर महसूल प्रशासन सक्रिय