कुर्झा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

By Admin | Updated: January 8, 2017 00:32 IST2017-01-08T00:32:12+5:302017-01-08T00:32:12+5:30

येथील एल.डी. बलखंडे कॉलेज आॅफ आॅर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स यांचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कुर्झा येथे स्वच्छ भारताकरिता युवा शक्ती या संकल्पनेवर आधारित शिबिर घेण्यात आले.

National Service Scheme Camp at Kurza | कुर्झा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

कुर्झा येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

बलखंडे महाविद्यालयाचा उपक्रम : निर्मलग्राम योजना राबवून आदर्श गाव बनविण्याचे आवाहन
पवनी : येथील एल.डी. बलखंडे कॉलेज आॅफ आॅर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स यांचे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत कुर्झा येथे स्वच्छ भारताकरिता युवा शक्ती या संकल्पनेवर आधारित शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य तोमेश्वर पंचभाई यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच शंकर फुंडे, उपसरपंच गोपीचंद दंडारे, उपसभापती अल्का फुंडे, प्राचार्य डॉ.जयकिशन संतोषी, रासेयो अधिकारी प्रा.एम.पी. सिंगाडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.मंगेश वाहाणे उपस्थित होते. यावेळी तोमेश्वर पंचभाई म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावाचा विकास, ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम योजना राबवून आदर्श गाव बनवा असे आवाहन केले. सरपंच शंकर फुंडे म्हणाले, गावाला आदर्श बनविण्याकरिता विविध योजनांची सुरुवात करून गाव विकासाचे कार्य करण्याचे आवाहन केले.
या शिबिरात ग्रामसफाई, नाल्यांची सफाई, गाजर गवत निर्मूलन, शौच खड्डे तयार रणे, कच्च्या नालीचे बांधकाम करणे, विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छ भारत अभियान व मानव आरोग्य यावर श्रीकांत शहारे व शाहीद अली, रस्ते वाहतूक व अपघात यावर सचिन गदादे पी.एस.आय. व सुहास चौधरी ए.पी.आय., नेत्र चिकित्सा शिबिर घेऊन ७६ रुग्णांची तपासणी करण्यात येवून औषधी वितरीत केली. व्यसनमुक्ती व मधुमेह या विषयावर डॉ.जी.एम. नंदागवळी, डॉ.आशिष मोहरकर, डॉ.अखिलेश कांबळे, डॉ.अश्विन गोटाफोडे यांनी मार्गदर्शन केले. वृक्ष संवर्धन विषयावर बागडे गुरुजी यांनी, सेंद्रीय शेती व जलव्यवस्थापन यावर दिलीप पाथोडे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरात निर्मल स्वच्छग्राम, हुंडाबळी, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, बेटी बचाओ बेटी पढाओ, इत्यादी सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक, पथनाट्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोषी होते. अतिथी म्हणून सरपंच शंकर फुंडे, जयप्रकाश गजभिये, अल्का फुंडे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.एन.पी. सिंगाडे यांनी केले.संचालन प्रा.विलास मेश्राम तर आभारप्रदर्शन प्रा.मंगेश वाहाणे यांनी केले. शिबिरासाठी प्रा.नाना जाधव, प्रा.शरद गजभिये, सुप्रिया चिंतनवार, रासेयो प्रतिनिधी श्रेखा खापर्डे, मयुरी पाटील, माधुरी पंचभाई, शुभांगी खांदाडे, सचिन सावरबांधे, अजिभीत जनबंधू, किरण गजभिये यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: National Service Scheme Camp at Kurza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.