राष्ट्रीय ग्रामीण पेयजय कार्यक्रम अंमलबजावणी कार्यशाळा

By Admin | Updated: August 30, 2014 23:28 IST2014-08-30T23:28:35+5:302014-08-30T23:28:35+5:30

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा यांच्यावतीने एक

National Rural Drinking Laboratory Implementation Workshop | राष्ट्रीय ग्रामीण पेयजय कार्यक्रम अंमलबजावणी कार्यशाळा

राष्ट्रीय ग्रामीण पेयजय कार्यक्रम अंमलबजावणी कार्यशाळा

भंडारा : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद भंडारा यांच्यावतीने एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल द्विवेदी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश सुशीर, उपकार्यकारी अभियंता व्ही.व्ही. करनेवार, उपअभियंता देशमुख, उपअभियंता बावनकर, गोन्नाडे, शाखा अभियंता भारत निर्माण कक्ष पी.एम. सावरकर, व्ही.सी. पिपरे, जे.वाय. बलभद्रे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची माहिती देवून कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने नवीन सुधारीत शासन निर्णयानुसार फायदा करून घेता येईल, याबाबत उपकार्यकारी अभियंता करनेवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात राहूल द्विवेदी यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असताना ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्याच्या दृष्टीने येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी अस्तित्वातील शासन निकषामध्ये सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा, पाणीपुरवठा योजनासाठी हागणदारीमुक्तीचे सुधारित धोरण, ग्रामीण पाणी पाणीपुरवठा योजनांची लोकवर्गणी पूर्ण रद्द करणे, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना आणि शासन निर्णयानुसार त्याची अंमलबजावणी याबाबत आशावाद व्यक्त केला.
सतीश सुशीर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने मागणी आधारित लोकसहभागाचे लोकाभिमूख धोरण स्विकारून योजनांच्या भांडवली खर्चामध्ये १० टक्के लोकहिस्सा लोकवर्गणीचा राहिल, अशी तरतूद केली होती. मात्र लोकवर्गणी जमा होत नसल्याने ती अट शासनाने रद्द केली असल्याची माहिती दिली आहे.
कार्यशाळेला प्रगती पथावरील व रखडलेल्या कृती आराखड्यामध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या योजनांचा गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, सचिव, संबंधित उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांची उपस्थिती होती. संचालन अजय गजापूरे यांनी तर आभार बबन येरणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, मूल्यमापन व सनियंत्रण सल्लागार सुशांत ढोके, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ निलिमा जवारे, लखाधिकारी प्रशांत फाये, स्वच्छता तज्ज्ञ गजानन भेदे, भूषण मुळे, देवेंद्र खांडेकर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: National Rural Drinking Laboratory Implementation Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.