राष्ट्रीय बौद्धीक, सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप
By Admin | Updated: October 27, 2016 00:31 IST2016-10-27T00:31:03+5:302016-10-27T00:31:03+5:30
स्थानिक महर्षि विद्या मंदिर शाळेतर्फे आयोजित त्रिदिवसीय राष्ट्रीय बौद्धिक, सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात व तेवढ्याच थाटात पार पडला.

राष्ट्रीय बौद्धीक, सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप
१५ पदकांसह आसाम प्रथमस्थानी : भंडारा द्वितीय स्थानावर, महर्षि विद्या मंदिर शाळेचा उपक्रम
भंडारा : स्थानिक महर्षि विद्या मंदिर शाळेतर्फे आयोजित त्रिदिवसीय राष्ट्रीय बौद्धिक, सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप मोठ्या उत्साहात व तेवढ्याच थाटात पार पडला. देशभरातून आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांनी या उत्सवातून आपल्या कलेची छाप भंडारेकरांवर उमटविली.
या स्पर्धेत सर्वाधिक १५ पदकांसह गुवाहाटी (आसाम) प्रथमस्थानी तर १२ पदकांसह भोपाल झोनमधून भंडारा द्वितीय स्थानी राहिला.
चॅम्पीयनशिल्ड मिळाली असून ढोल-ताशांच्या गजरात विजयी चमुंनी आनंदोत्सव साजरा केला. विजयी झालेल्या चमुला स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून प्रमुख अतिथी ब्रम्हचारी डॉ. गिरीशचंद्र वर्मा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तीन दिवसीय कार्यक्रमाला महर्षि विद्या मंदिर समुहाचे विविध संचालन, प्राचार्यगण, परीक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमानंतर द्वितीय सत्रात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही हजेरी लावली होती. त्यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या सुरूवातीला सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध शास्त्रीय वाद्यांच्या वादन तथा आर्केस्ट्राचा आनंद घेण्यात आला. (प्रतिनिधी)
अशी झाली स्पर्धा
स्पर्धेच्या अंतिम चरणात ब्रम्हचारी डॉ. गिरीषचंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व प्राचार्य श्रृती ओहळे यांच्या उपस्थितीत विजयी चमूंना व व्यक्तीगत स्पर्धेत प्रथम आलेल्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात हार्माेनियम, सोलो व आर्केस्ट्रामध्ये अवंती विनोद पत्थे पाचव्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम आली. ज्यु ग्रुप डॉन्समध्ये द्वितीयस्थान प्राप्त केले. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नयन घोडेले, नवसिका लिल्हारे, ग्रिष्मा उपरकर, धनश्री शहारे, चेतश्री पशिने, शर्वरी खोब्रागडे, शौर्या कांबळे आणि सिनीअर ग्रुपमध्ये अवंती उपाध्ये, कल्याणी भोंगाडे, श्रेयशी मते, ओजस्वी बोकडे, प्रांजल मेश्राम, नंदीनी लुथडे, नंदीनी गलत्री, श्रृती चेटुले यांनी सहभाग नोंदवून द्वितीय स्थान प्राप्त केला. मॅथ एक्झीविशनमध्ये अपुर्वा फंदे, सायन्स एक्झीविशनमध्ये आरोही चव्हाण हिने द्वितीय स्थान प्राप्त केले. या संपूर्ण स्पर्धेत रिझनवाईजनुसार प्रथमस्थान गुवाहाटी, द्वितीय भोपाल, तृतीय हैद्राबाद, चतुर्थस्थानी हरिद्वार, पाचव्या स्थानावर जबलपूर तर सहाव्या क्रमांकावर अलाहाबाद रिझनने बाजी मारली. तसेच उत्कृष्ट ग्रेड मिळविलेल्या शाळांना सात लक्ष, पाच लक्ष, तीन लक्ष, दोन लक्ष व एक लक्ष रोख व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धेत परीक्षक म्हणून श्रीपाद नवरे, जयश्री नवरे, ललीता पाटनकर, विठू दाढी, सुचना बंगाले, रूपा ठाकरे, मुकूंद धुर्वे, ऋषी अग्रवाल, शिक्षिका शोभने यांनी जबाबदारी पार पाडली. तीन दिवसीय कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका विभा मेश्राम, दिपाली ईश्वरकर, सृष्टी राठी, पुर्वा ईश्वरकर, आशय लांजेवार, पारूल बिसने, दिव्या सेलोकर, शुभान शेख यांनी केले. महोत्सवासाठी प्राचार्य श्रृती ओहळे यांच्यासह शिक्षक, शिक्षीका भाग्यश्री ब्राम्हणकर, जयश्री जोशी, विनोद पत्थे, प्रज्ञा संगीतवार, विभा मिश्रा, अनिल वाघमारे अन्य शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.