राष्ट्रीय आरोग्य मिशनचा जनसंवाद

By Admin | Updated: January 25, 2015 23:09 IST2015-01-25T23:09:27+5:302015-01-25T23:09:27+5:30

राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवावर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाचा एक भाग भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पंचायत समिती सभागृहात जनसंवाद साधी

National Health Mission's Mass Dialogue | राष्ट्रीय आरोग्य मिशनचा जनसंवाद

राष्ट्रीय आरोग्य मिशनचा जनसंवाद

तुमसर : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवावर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाचा एक भाग भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पंचायत समिती सभागृहात जनसंवाद साधी पुणे च्या सहकार्याने ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडाराने आयोजित केले होते.
जनसंवादाच्या पॅनेलमध्ये पुणे येथील साधी संस्थेच्या राज्य समन्वयक शकुंतला भालेराव व भाऊ अहेर, तुमसरच्या मीरा भट्ट, अमरावतीचे डॉ. राहुल बैस व भंडाराचे डॉ.एल.एम. चौधरी हे होते. आरोग्य सेवाबद्दल लाभार्थ्यांचे मत जाणून घेण्यासाठी तुमसरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कुरैशी, लेंडेझरी आरोग्य केंद्राचे मेडीकल आॅफीसर डॉ.लुंगे, चुल्हाडचे डॉ.शेंडे तसेच तुमसर तालुक्याचे आरोग्य विस्तार अधिकारी व्ही.टी. डोंगरे सहभागी झाले.
जनसुनावणी मध्ये तुमसर तालुक्याच्या लेंडेझरी, गोबरवाही व चुल्हाड आरोग्य केंद्राच्या क्षेत्रामधील गावातील दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा मातामृत्यू, बालमृत्यू, आरोग्य सेवाची माहिती लोकापर्यंत पोहचविणे, लाभार्थ्यांचे समाधान असमाधान, ठोस माहितीच्या आधारे लोकांच्या समस्या कार्यक्रमात उपस्थित करण्यात आल्या. वरील परिस्थिती सुधारण्यासाठी आरोग्य हा विषय बनवावा, ठिकठिकाणचे आरोग्य प्रश्न वेशीवर टांगले जावेत तेव्हा सर्वांना आरोग्य सेवा हे प्रत्यक्षात येईल. लोकांनी जागृती, समीक्षा आणि संघर्ष करायला हवा अशी भूमिका पॅनलच्या प्रतिनिधींनी घेतली.
प्रभावी मुद्यास घेऊन अधिकारी व लोकांमध् ये चर्चा घडवून तोडगा काढण्याच्या भूमिका निश्चित करण्यासाठी तालुकास्तरीय आठ लोकांचे प्रतिनिधी मंडळाची निश्चिती करण्यात आले. त्यांनी आमदारांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत चर्चा करण्याचे ठरले. तसेच राज्यव्यापी प्रश्नांची पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच गावस्तरावर ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा समितींना सक्षम करण्याकरिता प्रशिक्षण आखणी करणे, योजनांची माहिती प्रसारण करण्याकरिता प्रत्येक गावात बॅनर लावून जागृती करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कार्यक्रमाला तुमसर तालुक्यातील महिला, पुरुषांनी सहभाग घेतला. कश्मीर मेश्राम यांनी कार्यक्रमाचे संचालन, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे सचिव, अविल बोरकर यांनी आरोग्य प्रश्नाचे विश्लेषण मांडणी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यात योगेश टेंभरे, जगन्नाथ कटरे, वामन सिंगनजुडे यांनी मोलाचे सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: National Health Mission's Mass Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.