रुग्ण सोसताहेत नरकयातना

By Admin | Updated: July 17, 2014 23:53 IST2014-07-17T23:53:58+5:302014-07-17T23:53:58+5:30

शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या पलंगावरील गाद्यांच्या अक्षरश: चिंध्या झालेल्या आहेत. इमारतीला मोठ्या भेग्या पडल्या असून येथील शौचालयामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Narakkanya by the patient sitting there | रुग्ण सोसताहेत नरकयातना

रुग्ण सोसताहेत नरकयातना

तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार : शौचालयाची स्थिती जी
तुमसर : शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या पलंगावरील गाद्यांच्या अक्षरश: चिंध्या झालेल्या आहेत. इमारतीला मोठ्या भेग्या पडल्या असून येथील शौचालयामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्याची काळजी घेण्याचा दावा रुग्णालय प्रशासनाचे येथे पिळत उघडे पडले आहे. येथील व्यवस्थापन काय पाहते हा मुख्य प्रश्न आहे.
वॉर्ड क्रमांक एक कडे जाणाऱ्या दालनात मोठ्या भोगा पडल्या आहेत. या भेगामधून पावसाळ्यात पाणी गळती होते. भेगा मोठ्या असल्याने ही इमारत केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. रुग्णांच्या पलंगावरील गाद्यांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक गाद्या अक्षरश: फाटलेल्या आहेत. याच गाद्यावर रुग्णांना झोपावे लागते .या गाद्यांची दुर्गंधी येऊन उग्र वास येत आहे. चादरही फाटल्या आहेत. शौचालयांची स्थिती अत्यंत वाईट आहे. पुरुष शौचालयात घाणच घाण असून आरोग्यावर उलट परिणाम होण्याची शक्यता आहे.
शौचालयात प्लास्टीक बॉटल व विटांचा खच पडून आहेत. या समस्येची तक्रार कुणाकडे करावी, कुणीही लक्ष देत नाही. कारवाई येथे शूृन्य आहे. तीन कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांचा हे रुग्णालय तीन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असल्याचे प्रशासन सांगत आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक व त्यांची चमूंचे रुग्णालयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. आरोग्याचा समावेश मूलभूत हक्कात होतो हे हक्कच येथे मिळत नाही. उलट या रुग्णालयात आल्यावर आजार घेऊनच घरी परतावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णालय व्यवस्थापन समिती येथे कागदावरच आहे. आरोग्याकरिता शासन येथे निधी देत नसल्याचे दिसून आले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Narakkanya by the patient sitting there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.