नाना पटोलेंनी सोडविले शेतकऱ्यांचे उपोषण
By Admin | Updated: November 8, 2015 00:45 IST2015-11-08T00:45:44+5:302015-11-08T00:45:44+5:30
तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात रेंगेपार येथे साखळी उपोषण सुरु होते.

नाना पटोलेंनी सोडविले शेतकऱ्यांचे उपोषण
लाखनी : तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यासंदर्भात रेंगेपार येथे साखळी उपोषण सुरु होते. खासदार नाना पटोले यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पटोले यांनी दिल्यानंतर लिंबू पाणी पाजून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविले.
तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील पैसेवारीची फेर चौकशी करावी, सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, ग्रामस्थांना रोजगारासाठी रोहयोची कामे सुरु करावी, वनजमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टे देण्यात यावे, सिंचनाची सोय करण्यात यावी, रेंगेपार तलावाचे खोलीकरण करून नवे कॅनल तयार करावे, लाखनी रेंगेपार रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात २० आॅक्टोंबरपासून येथील सुभाष चौकात साखळी उपोषण सुरु होते. या उपोषणाची दखल घेत खासदार पटोले यांनी सरपंच वैशाली खोब्रागडे, उपसरपंच दिपक काडगाये, धनंजय लोहबरे, खुशाल भांडारकर, किरण काडगाये, खुशाल पुडके, नरहरी पिंपळशेंडे, मंगलमूर्ती झंझाड, श्रावण हजारे, मनिषा मेश्राम, अनिता निंबार्ते, सुविद्या टेंभुर्णे या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन शंकांचे समाधान करून लिंबूपाणी पाजून उपोषण सोडविले. यावेळी भाजपाचे बबलू निंबेकर, टिकेश गायधनी, सत्यवान वंजारी, किशोर साखरे, महेश आकरे, सुधीर गिऱ्हेपुंजे प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)