लग्नाच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय

By Admin | Updated: July 7, 2014 23:24 IST2014-07-07T23:24:16+5:302014-07-07T23:24:16+5:30

परप्रांतात मुली विकण्याचा गोरखधंदा अनेक वर्षापासून गाजत असताना यात गुंतलेल्या एजंटानी नवीन शक्ल लढवून मुली विकण्याच्या नावावर लग्न लावून देत आहेत. लग्न लावून देण्याच्या

In the name of the looted gang active | लग्नाच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय

लग्नाच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय

परप्रांतातील एजंट संपर्कात : सासरी निघालेली मुलगी फरार
वरठी : परप्रांतात मुली विकण्याचा गोरखधंदा अनेक वर्षापासून गाजत असताना यात गुंतलेल्या एजंटानी नवीन शक्ल लढवून मुली विकण्याच्या नावावर लग्न लावून देत आहेत. लग्न लावून देण्याच्या नावावर पैसे घेवून नवरी मुलीसह एजंट पसार झाल्याची घटना वरठी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यात टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचे परप्रांतील एजंटासोबत लागेबांधे असून यात महिलांचा समावेश आहे. या प्रकरणातील सत्यता व आरोपी पोलिसांना गवसली नसून या रॅकेटमध्ये गुंतलेल्याना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ जिल्ह्यातील कटोरा येथील अनिलकुमार शर्मा यांच्याकडे दीवानटोला, वाघनदी येथील उषा तोमर नामक युवती भाड्याने राहत होती. अनिलकुमार शर्मा हे अविवाहित असून अनेक दिवसापासून लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. त्यांना मुलीचा शोध अल्याचे हेरून उषाने महाराष्ट्रात खुप मुली आहेत. मी तुमच्या मुलाचे लग्न लावून देते, असे सांगितले. याकरिता दोन महिन्यापुर्वी ती शर्मा कुटुंबीयांसोबत भंडारा येथे आली होती. त्यावेळी उषाला न सांगता या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या गोंदिया येथील वैशाली या महिलेचे मोबाईल नंबर दिले. त्यानंतर ते नियमित संपर्कात होते.
मागील आठवड्यात वैशालीने शर्मा कुटुंबीयांना भंडारा येथे बोलाविले. अनिलकुमार शर्मा हे त्यांची आई, मावशी, मावसभाऊ व उषासोबत ते भंडारा येथे दाखल झाले. वैशालीने भंडारा येथील फारूक नामक तरुणाच्या मध्यस्थीने मुलगी दाखविण्याचा बेत आखला. यासाठी फारूकने त्यांना मारूती व्हॅन एम.एच. ४०/एच.८५१० भाड्याने करून दिली. वैशाली, उषा व व्हॅन चालकासोबत फारूक त्यांच्या संपर्कात होता.
भंडारा येथे त्याने राजु कटरे नामक इसमाची त्याची ओळख करून देवून हा मुलीचा भाऊ असल्याचे सांगितले. त्यादिवशी ते सर्व गोंदिया जिल्ह्यातील बाम्पेवाडा येथे मारूती व्हॅनने मुलगी पाहण्यासाठी गेले. शर्मा कुटुंबीयांना मुलगी पसंद येताच त्यांनी त्यांच्याकडून लग्नाचा खर्च म्हणून ५० हजार रूपये घेतले. देवमुंढरी येथील देवीच्या मंदिरात त्यांचे लग्न लावून देण्यात आले. लग्न लावून नवरी मुलीला घेऊन शर्मा कुटुंबीय स्वगावी जाण्यासाठी मारूती व्हॅनने भंडारा रोड रेल्वे स्थानकावर येण्यासाठी निघाले. त्यांच्या मागोमाग फारूक व उषा ही दुचाकी एम.एच.३६/एस.२४६९ ने येत होते.
मुलीचे नाव योगिता नागपुरे असे सांगण्यात आले होते. भंडारा रोड रेल्वे स्थत्तनकावर येताना नवरीने तब्येत बिघडल्याचे सांगून व्हॅन थांबविली. मागेहून येत असलेल्या फारूकने त्या मुलीला दुचाकीवर बसवून पळ काढला. दरम्यान ते सर्व जण भंडारा रोड येथे आले. ठरल्यानुसार एजंट असलेली उषा व वैशाली यांना पैसे मिळाले नाही. उषा व वैशालीच्या या व्हॅनमध्ये असल्यामुळे शर्मा कुटुंबीयांनी त्यांना मुलगी आणून द्या नाही तर पैसे द्या म्हणून तगादा लावला. या गोधळात व्हॅन चालकाने त्यांना पैसे मागितल्यामुळे प्रकरण तापले. गोंधळ ऐकून नागरिक जमा झाले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून एकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी शर्मा यांच्या तक्रारीवरून फारूक, राजु कटरे व योगिता नागपुरे याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. परंतु त्या तिघाची ओळख व पत्ता नसल्यामुळे तपास थंडावला आहे.
एकंदरीत या प्रकरणाची मुळे खोलपर्यंत रूजलेली आहेत. फारूक हा मुख्य सुत्रधार असून त्याला मदत करणारा राजु कटरे व योगिता नागपुरे यांनी यापूर्वी एकाच मुलीचे अनेकांशी लग्न लावून दिल्याचे समजते. याकरीता गोंदिया येथील वैशाली व मुळची वाघनदी येथील उषा ही एजंट होती. वैशालीच्या माध्यमातून परप्रांतातील लोकांना संपर्क करून त्यांना फारूकच्या सहकार्याने मुलगी दाखवणे व लुटणे हा प्रकार सुरू होता. याकरीता उषा व वैशाली यांना १० हजार मिळत होते. उषा ही या रॅकेटची सदस्य असून परप्रांतातील कुटुंबियांना फसविण्याचे काम करीत होते. (वार्ताहर)

Web Title: In the name of the looted gang active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.