शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या यादीत नाव; पण कर्जमाफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 22:04 IST

विनोद मेंढे यांच्याकडे घोडेझरी शिवारात दीड एकर शेती आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असताना लाभ मिळाला नाही.  पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. तरीसुद्धा सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली. ऐन धान कापणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्यामुळे हातात आलेल्या पिकाचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले, आपण कर्जमुक्त होऊ असे वाटले. कर्जमाफीसाठी पात्र असताना अद्यापही लाभ मिळाला नाही. पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. आता आम्ही शेतकऱ्यांनी करायचे तरी काय? सरकार प्रोत्साहन अनुदान देणार की कर्जमुक्ती करणार. आम्हाला वाऱ्यावर तर सोडणार नाही ना, असा उद्विग्न सवाल लाखांदूर तालुक्यातील घोडेझरी येथील शेतकरी विनोद मेंढे करत होते. त्यांच्यासारखीच इतर शेतकऱ्यांचीही अवस्था जिल्ह्यात आले. विनोद मेंढे यांच्याकडे घोडेझरी शिवारात दीड एकर शेती आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी ते पात्र असताना लाभ मिळाला नाही.  पीक कर्ज फेडू न शकल्यामुळे प्रोत्साहन अनुदानही मिळणार नाही. तरीसुद्धा सावकाराकडून कर्ज काढून खरीप हंगामात धान पिकाची लागवड केली. ऐन धान कापणीच्या वेळी परतीचा पाऊस आल्यामुळे हातात आलेल्या पिकाचे नुकसान झाले. महाविकास आघाडीचे सरकार येताच महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दाेन लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्यानंतर  कोविडचे संकट आल्याने नंतर दिल्या जाईल, असे आश्वासन  देण्यात आले. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार अनुदान देण्याचे आश्वासन दिले. २० ऑक्टोबर रोजी प्रोत्साहनाची रक्कम अदा केली. मात्र, कर्जमुक्ती योजनेला पात्र असूनही आतापर्यंत लाभ मिळाला नाही. नवीन सरकार येताच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय काढला व  पात्र शेतकऱ्यांची यादीही प्रसिद्ध केली. मात्र, यात विनोदचे कुठेच नाव नाही, अशीच अवस्था इतरही शेतकऱ्यांची आहे. 

वाढता खर्च आणि हमीभाव कमी 

- दिवसेंदिवस वाढणारी महागाई, शेतीसाठी लागणारा खताचा खर्च, इंधन वाढल्यामुळे ट्रॅक्टरच्या भाड्याचा खर्च, धानावर येणाऱ्या रोगांमुळे औषधीचा खर्च, वाढती शेतमजुरीचा खर्च तसेच इतर सर्व बाबींचा खर्च आणि पिकांवर येणारे अनेक नैसर्गिक संकट यामुळे उत्पादन कमी. एवढा खर्च असताना केंद्र सरकारकडून मिळणारा तुटपुंजा हमीभाव यामुळे शेतीसाठी घेतलेले कर्जही फेडू शकत नाही. 

कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव आले. मात्र, ना कर्जमाफी झाली नाही. प्रोत्साहन अनुदान यादीत नाव  टाकून सरकारने किमान एकतरी लाभ घ्यावा.  - विनोद मेंढे, शेतकरी, घोडेझरी

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजना