धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा
By Admin | Updated: January 17, 2015 22:53 IST2015-01-17T22:53:46+5:302015-01-17T22:53:46+5:30
गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो.

धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा
भंडारा : गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो. ज्यांना आधी जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावले त्यांची फक्त 'घर वापसी' होत आहे. त्याला आम्ही धर्मांतरण मानत नाही.
आपल्या धर्माला मानणे हा काही दोष नाही. अयोध्येत राममंदिर उभारणारच याला कोणताही धर्म रोखू शकत नाही. प्रत्येक हिंदूच्या मनात अयोद्धेबाबत एकच कल्पना आहे, ती म्हणजे रामललाचा मंदिर उभारणे होय. कुणाचीही निंदा कधी करू नये. उत्तम संस्कारातून चरित्रवान पिढी निर्माण करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असेही महाराज म्हणाले. रविदास खाकी महाराज म्हणाले, गोहत्या थांबविण्यासाठी प्रत्येकाने विडा उचला पाहिजे.
गोमातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूमध्ये जागृती झालीच पाहिजे, जेणे करून येणाऱ्या पिढीला त्याचा वारसा जपता येईल. बाल वैदेही साध्वी बालिका सरस्वती यांनी महिला व युवतींना सशक्त होण्याचे आवाहन केले. जो महिलेची छेड काढतो त्याला त्याचवेळी धडा शिकविला पाहिजे. महिला अबला नसून सबला आहे. बाहेर देशातील शत्रू आपल्या देशात शिरून आपल्याला ललकारत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवायलाच हवा. यावेळी भदंत रावजी पिंडे, प्रा. व्यंकटेश आबदेव, अन्नाजी हांडे यांनीही मार्गदर्शन केले.
संमेलनाची सुरूवात महाराजांच्या हस्ते गोमातेचे पूजन व भारत माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात होण्यापुर्वी दुर्गा वाहिणीच्या सदस्यांनी तलवारबाजी व सुरक्षा संदर्भात प्रदर्शन सादर केले.
संचालन सुभाष आजबले यांनी तर प्रास्ताविक विहिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे यांनी केले. यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी 'अन्नरक्षण' बाबत प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)