नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्र वाऱ्यावर

By Admin | Updated: November 3, 2014 23:20 IST2014-11-03T23:20:17+5:302014-11-03T23:20:17+5:30

तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगातील नव्याने स्थापीत झालेले दोन वनपरिक्षेत्र सध्या वाऱ्यावर दिसून येत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याव्यतिरिक्त इतर कर्मचारी मुख्यालयी राहत

Nakadongri, Landangee forest range | नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्र वाऱ्यावर

नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्र वाऱ्यावर

तुमसर : तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगातील नव्याने स्थापीत झालेले दोन वनपरिक्षेत्र सध्या वाऱ्यावर दिसून येत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याव्यतिरिक्त इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. तीन महिन्यापूर्वी पेंच राष्ट्रीय अभयारण्यातील वाघाच्या शिकारी प्रकरणात नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत चिचोली उत्तर राऊंडमधील दावेझरी या गावात एका आरोपीकडे वाघाचे चार ते पाच नख सापडली होती. दोन्ही वनपरिक्षेत्र रात्री वाऱ्यावर असतात अशी माहिती आहे.
५ वर्षापूर्वी तुमसर वन परिक्षेत्रापासून नाकाडोंगरी व लेंडेझरी दोन वनपरिक्षेत्र स्वतंत्र करण्यात आले होते. १०० किमीचे हे सातपुडा पर्वत रांगातील घनदाट जंगल आहे. जंगलातील वनसंपदा व वन्यपशूंची सुरक्षितता महत्वाचे मानून राज्य शासनाने दोन वनपरिक्षेत्र स्वतंत्र केले होते.
भंडारा जिल्हयाची सीमा संपल्यानंतर नागपूर जिल्हयाची सीमा लेंडेझरी वनपरिक्षेत्रानंतर सुरु होते. जर नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राची सीमा मध्यप्रदेशाला भीडल्या आहेत. भंडारा जिल्हयातील सर्वात मोठे व घनदाट जंगल म्हणून लेंडेझरी व नाकाडोंगरीची शासनदप्तरी नोंद आहे. लेंडेझरी हिवरा बाजार रामटेक असा डामरी रस्ता या वनपरिक्षेत्रातून जातो त्यामुळे वनतस्करीला येथे मोठा वाव आहे.
नाकाडोंगरी मुख्यालयासमोरुनच तुमसर-कटंगी (बालाघाट) हा आंतरराज्यीय महामार्ग मध्य प्रदेशाकडे जातो. लेंडेझरी व नाकाडोंगरी येथे वनविभागाचे तपासणी नाके केवळ नावापुरतेच आहेत. या तपासणी नाक्यावर आतापर्यंत मोठी तपासणीसह कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. जंगलातील अभ्यासू व खबरे या दोन्ही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे नाहीत. रात्री ही दोन्ही जंगले वाऱ्यावरच असतात. रात्री जंगलातील मुख्य मार्गावर गस्तीचा नियम आहे, परंतु अशी गस्त येथे होतांनी कुणीच पाहिली नाही.
पेंच राष्ट्रीय अभयारण्यात अडीच ते तीन महिण्यापूर्वी एका वाघाच्या शिकारीप्रकरणी एका टोळीला अटक करण्यात आली होती. या टोळीचे तार ओडीशा राज्याशी जुळले होते. वाघाची पाच नखे वनपरिक्षेत्रातील चिचोली उत्तर राऊंडमधील दावेझरी या गावात एका आरोपीच्या घरी सापडले. तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी तथा लेंडेझरी वनपरिक्षेत्रात आजही वाघ, बिबट व इतर वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. बावनथडी प्रकल्पाच्या वितरिका या दोन्ही वनपरिक्षेत्रातून जातात. एकेकाळी या जंगलात वाघ, बिबट्यांची संख्या मोठी होती, परंतु आज ती संख्या बोटावर मोजण्याइतकरी राहिली आहे.
दावेझरी येथील म्होरक्याचे तार आंतरराज्यीय टोळीशी असल्याने या जंगलातील शिकार झाली असेल यात शंका नाही. या दोन्ही वनपरिक्षेत्रातील मुख्य रहदारीच्या रस्त्याने फेरफटका मारल्यावर वनविभागाचे कर्मचारी दिसत नाहीत. त्यामूळे जंगल सुरक्षित असेल काय? असा प्रश्न उपस्थित होतो. लेंडेझरी येथील वनविभागाच्या सदनीका जिर्णावस्थेत आहे. नाकाडोंगरी येथील सदनीका शेवटच्या घटका मोजत आहे. येथे राज्य शासनही गंभीर दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nakadongri, Landangee forest range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.