नगरपंचायतीत नगरपरिषदेची अडचण?
By Admin | Updated: February 5, 2015 23:02 IST2015-02-05T23:02:58+5:302015-02-05T23:02:58+5:30
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तालुकास्तरीय २३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय केला. या नगरपंचायतीमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी व मोहाडी

नगरपंचायतीत नगरपरिषदेची अडचण?
संजय साठवणे - साकोली
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील तालुकास्तरीय २३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्याचा निर्णय केला. या नगरपंचायतीमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली लाखनी व मोहाडी या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या तिनही नगरपंचायतीची प्रक्रिया पूर्ण झाली असून फक्त घोषणेची औपचारिकता बाकी असताना साकोली नगरपंचायतीच्या स्थगीतीला प्रस्ताव नुकताच ग्रामविकास मंत्रालय मुंबई येथे पोहचल्याने साकोली नगरपंचायत होणार की नाही यात शंका आहे.
माहितीनुसार, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील १३८ ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यानुसार शासनस्तरातून जवळपास पूर्णच प्रक्रिया पूर्ण झाली असून ग्रामपंचायत ठरावासह इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. ३ ला साकोलीचे पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, मोहाडीचे पंचायत समिती सदस्य कोसरे व लाखनीच्या पंचायत समिती सदस्या निखाडे यांना त्या त्या गावाच्या नगरपंचायती संदर्भात त्यांची पदे रद्द होत असल्यामुळे त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात त्यांना बोलावून त्यांचेकडून लेखी घेण्यात आले. यावेळी तिन्ही सदस्यांनी नगरपंचायत करण्यास काहीही हरकत नसल्याचे लिहून दिले.
यानंतर जिल्हाधिकारी माधवी खोडे या स्वत: याच प्रकरणाच्या संदर्भाने तात्काळ मुंबई येथे निघून गेल्या. त्यामुळे याच महिन्यात तिन्ही नगरपंचायतीसंदर्भात नक्कीच निर्णय होऊ शकतो.
यात मात्र हे तिन्ही पंचायत समिती क्षेत्र कमी होणार आहेत. तशी माहिती संबंधित सदस्यांना कळविण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. अनेक दिवसापासून नगरपंचायतीचे वेध साकोलीवासीयांना लागलेले असताना प्रस्तावाच्या स्थगीतीबाबत तालुक्यात चर्चेला उधान आलेले आहे.