नगराध्यक्ष कारेमोरे यांचा नागरी सत्कार
By Admin | Updated: September 14, 2016 00:37 IST2016-09-14T00:37:23+5:302016-09-14T00:37:23+5:30
तुमसर शहराचा विकास घडवून शहराच्या सौंदर्यीकरणात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी भर घातली.

नगराध्यक्ष कारेमोरे यांचा नागरी सत्कार
विकास कार्याची घेतली नागरिकांनी दखल : तुमसरचा राजा गणेश मंडळाचा पुढाकार
तुमसर : तुमसर शहराचा विकास घडवून शहराच्या सौंदर्यीकरणात नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी भर घातली. त्यांच्या कार्याची दखल घेत तुमसरकरांनी नगराध्यक्ष कारेमोरे यांचा जाहीर सत्कार केला. हा सत्काराचा कार्यक्रम तुमसरचा राजा गणेश मंडळाच्या पुढाकारातून घेण्यात आला.
तुमसरनगरीच्या अध्यक्षपदाची धुरा ही नव्या दमाचा युवा तरुण इंजि. अभिषेक कारेमोरे यांनी हाती घेतली. त्यावेळी विविध चर्चेला पेव फुटले होते. नगर परिषद चालविणे म्हणजे बालकांचे खेळ नव्हे, असे टिप्पणी कारेमोरे यांच्याबाबत केली जात होती. मात्र मनात जिद्द बाळगुन शहराचा कायापालट करण्याचा निर्धार करीत तुमसर शहराला ‘क्लिन अँड ग्रीन’ बनविले. त्याचबरोबर गांधी सागर तलावात उद्यान, तुमसर भंडारा रोड वरती दुभाजकावर एल.ए.डी. लाईटचे विद्युत खांब, कुंडी, झाडे लावून सुशोभीत केले. शासनाचे सर्व योजना राबवून शासकीय पातळीवर त्यांचा सत्कार झाला. आदी महत्वपूर्ण कार्य नगराध्यक्ष यांनी लक्ष घालून पूर्ण केल्याने श्री साई गजानन कार्यसंघ तुमसरचा राजा गणेश मंडळ तर्फे तसेच न.प. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी दिपक कठाणे, प्रेम पटले, प्रमोद इलमे, देवदत्त नागदेवे, वहिद खान, जगदीश ठाकरे, किशोर साखरकर, सुनिल चौधरी, प्रविण बोरकर, प्रशांत गणवीर, सुमेध खापर्डे, सुनिल लांजेवार, मोहन बोरघरे, गणेश मेहर, गणेश बालपांडे, जमील शेख, तासीर सैय्यद, मोरेश्वर कापसे, कुमार रगडे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)