शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

नईम शेख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; सहा आरोपींना अटक, तीन जण फरार

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 26, 2023 14:53 IST

पिस्तुल, चाकूसह तवेरा वाहन जप्त

भंडारा : नागरिकांची आणि पोलिसांची झोप उडवून देणाऱ्या नईम शेख याच्या खळबळजनक सिनेस्टाईल खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. संतोष डहाट असे त्याचे नाव असून तो हिस्ट्री सीटर आरोपी आहे. त्याच्यासह अन्य सहा जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. या खून प्रकरणातील अन्य तीन आरोपी फरार आहेत.

तुमसर तालुक्यातील गोबरवही येथे सोमवारी सायंकाळी ५:१५ वाजता झालेल्या खुनानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली. रात्रीच गोबरवाही जवळील हेटी या गावातून चार जणांना अटक केली. या अटकेतील आरोपींनी मुख्य सूत्रधार संतोष डहाट हा असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री पुन्हा त्याच्यासह अन्य एकाला अटक केली. त्यामुळे आतापर्यंत अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये संतोष डहाट (३३, आंबेडकर वार्ड, तुमसर), शुभम उर्फ सागर पंधरे (नवीन हसारा टोली तुमसर), गुणवंत उर्फ अतुल यवकार (३०, नाका वाडी, नागपूर), आशिष नेवारे (३२, जयताळा, नागपूर), रवी रतन बोरकर (३५, इंदुरा बाराखोली चौक, जरीपटका नागपूर) आणि दिलखुश उर्फ मोनू कोल्हटकर (२८, मालवीय नगर गौतम पेठ तुमसर) यांचा समावेश आहे. यासोबतच सतीश डहाट (२७, आंबेडकर वार्ड तुमसर),  विशाल मानेकर (३२, हुडको कॉलनी नागपूर) आणि अमन मेश्राम (२९, आंबेडकर वार्ड तुमसर) हे तीन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपींवर कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ सह कलम ३/२५, ४/२५, २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेत उतरणीय तपासणीसाठी नागपूरला

देशी कट्ट्याच्या गोळ्या झाडून नईम शेख याचा खून करण्यात आला होता. त्यानंतर चाकूने गळा कापण्यात आला होता. त्याच्या मृत्यूच्या अधिक चौकशीसाठी आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी मृतदेह नागपूरला पाठवण्यात आला असून तिथे शवविच्छेदनंतर नातेवाईकांकडे सोपविण्यात येणार आहे.

चार आरोपी नागपुरातले

या घटनेमध्ये पोलिसांच्या यादीत आलेल्या नऊ आरोपींपैकी चार आरोपी नागपूर येथील असून हिस्ट्री सीटर आहेत. तर संतोष डहाट आणि सतीश डहाट हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.

वर्षभरापूर्वी झालेल्या गोळीबाराचा बदला

सुमारे वर्षभरापूर्वी नईम शेख याने आपल्या हस्तकांकरवी संतोष डहाट याच्यावर गोळीबार केला होता. मात्र सुदैवाने त्यातून तो बचावला. यामुळे संतोष या घटनेचा बदला घेण्याची संधी शोधातच होता. दरम्यान त्याने नवीन शेख यांच्या बद्दलची संपूर्ण माहिती मिळवून व त्याचे लोकेशन माहीत करून सोमवारी त्याचा गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ गेम केला. वर्चस्ववादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा