वृक्षारोपणाच्या रोपट्यांची परस्पर विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:45+5:30
शासनाने पर्यावरण संतुलनासाठी गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. परंतु आता या मोहिमेनंतर वृक्षारोपण खरेच योग्य ठिकाणी झाले काय, यावर संशय व्यक्त होत आहे.

वृक्षारोपणाच्या रोपट्यांची परस्पर विल्हेवाट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ३३ कोटी वृक्षारोपण मोहीम शासनाच्यावतीने राबविल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात वृक्षांचे रोपण झाले काय, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, असाच एक प्रकार तुमसर तालुक्यातील अंबागड येथे उघडकीस आला. एक-दोन नव्हे तब्बल ट्रॅक्टरभर रोपटे बेवारसपणे टाकून दिल्याचे दिसून आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली.
शासनाने पर्यावरण संतुलनासाठी गत काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतले आहे. यंदा ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली. परंतु आता या मोहिमेनंतर वृक्षारोपण खरेच योग्य ठिकाणी झाले काय, यावर संशय व्यक्त होत आहे. ग्रीनहेरीटेज पर्यावरण संस्थेचे मंजूर अहेमद यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी संस्थेचे मो. सईद शेख यांना माहिती दिली. त्यावरून नाकाडोंगरी येथील वनविभागाला कळविण्यात आले. हे रोपटे नेमके कुठले याचा शोध घेण्याची गरज आहे.