बालकांना परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:46+5:302021-05-11T04:37:46+5:30
बालकांची परस्पर दत्तक देवाणघेवाण करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशा घटना उघडकीस आल्यास प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल ...

बालकांना परस्पर दत्तक घेणे हा कायद्याने गुन्हा
बालकांची परस्पर दत्तक देवाणघेवाण करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. अशा घटना उघडकीस आल्यास प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती आणि आपल्या परिसरातील पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना ताब्यात घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करावे. त्या बालकांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. बाळ दत्तक घेण्यासाठी त्याचबरोबर ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचे आहे, अशा पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या कारा www.cara.nic.in या संकेतस्थळावर आहे. बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह या सारख्यांसमस्या सोबतच आता कोरोनामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्याने अनेक मुले अनाथ होण्याची समस्या समोर येत आहे तर एकीकडे या बालकांचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. समाजकंटक याचा वापर संधी म्हणून करून घेत परस्पर मुलांची विक्री करत आहेत. समाजमाध्यमांवरील पोस्टवरून बालके दत्तकास उपलब्ध आहेत, असे चित्र निर्माण केले जात आहे. यातून बालकांची विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन जिल्हा माहिला बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी केले आहे.