तीन तलाकच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:29 IST2018-04-07T22:29:43+5:302018-04-07T22:29:43+5:30

तीन तलाक विधेयकाच्या विरोधात येथील मर्कजी सिरतुन्नबी कमेटीच्या पुढाकारात येथील मुस्लीम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

Muslim women's silent march against three divorces | तीन तलाकच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा

तीन तलाकच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तीन तलाक विधेयकाच्या विरोधात येथील मर्कजी सिरतुन्नबी कमेटीच्या पुढाकारात येथील मुस्लीम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
हा मोर्चा खामतलाव चौकातील नुसी मशिद येथून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. या मोर्चात शमीम फातिमा, पंजुम फातिमा, आलेमा सना, तहेसनि फातिमा, डॉ.सायरा सुब्हान, डॉ.सबा काझी, डॉ.शमा शेख, नगरसेविका अख्तरी बेगम, नगरसेविका शमीमा शेख, सीमा पटेल, प्रा.शमा बाजी, शिक्षिका शमीम खान, शबाना शेख, रिहा शेख, तस्मीया कौसर, शबाना खान, आसमा फातिमा यांच्यासह शेकडो महिलांचा समावेश होता.

Web Title: Muslim women's silent march against three divorces