आरक्षणासाठी मुस्लीम बांधवांचा मोर्चा
By Admin | Updated: October 21, 2016 00:42 IST2016-10-21T00:42:33+5:302016-10-21T00:42:33+5:30
मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून जिल्ह्यातील जमियते उलेमा हिंद संघटनेद्वारा १८ आॅक्टोबरला शहरात मोर्चा काढण्यात आला

आरक्षणासाठी मुस्लीम बांधवांचा मोर्चा
भंडारा : मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून जिल्ह्यातील जमियते उलेमा हिंद संघटनेद्वारा १८ आॅक्टोबरला शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्च्याचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मोहम्मद साजीद यांनी केले.
सदर मोर्चा मुस्लीम लायब्ररी चौकातून काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय चौकात पोहचल्यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रपती तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. भारत देशातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश व पश्चिम बंगाल राज्यात मुस्लिम समाजाला आरक्षण आहे. मात्र महाराष्ट्र शासन मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर कानाडोळा करीत आहे. मुफ्ती मोहम्म्द साजीद म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समुदायाचे मोठे योगदान आहे. मागील शासनाने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र विद्यमान शासन त्या निर्णयावर दुर्लक्ष करीत आहे. सदर आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. मोर्च्यात संघटन सचिव मौलाना फराज अहमद, जिया पटेल, शम्मु शेख, नगरसेवक मकसुद खान, राजू हाजी सलाम, फरहान पाशा पटेल, अनिक जमा पटेल, जकरीया खत्री यासह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)