मुरमाडी सरपंचाविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला
By Admin | Updated: August 26, 2014 23:16 IST2014-08-26T23:16:29+5:302014-08-26T23:16:29+5:30
मुरमाडी (तुपकर) येथे सन २०१२ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात प्रमिला चौधरी यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. १८ महिने सुरळीत गेल्यानंतर उपसरपंच दिगांबर बावनकुळे,

मुरमाडी सरपंचाविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला
लाखनी : मुरमाडी (तुपकर) येथे सन २०१२ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात प्रमिला चौधरी यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. १८ महिने सुरळीत गेल्यानंतर उपसरपंच दिगांबर बावनकुळे, सदस्य घनश्याम गिलोकर, वैशाली कोरे, सुषमा देशमुख, सुनिल चापले, शाहिन पठान, लोमेश बावनकुळे या सात सदस्यांनी लाखनीचे तहसीलदार समर्थ यांचेकडे सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. तहसीलदारांनी विशेष सभा बोलविली. या सभेत सरपंच प्रमिला चौधरी यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणारे ग्रामपंचायत सदस्य सुषमा देशमुख या अनुपस्थित राहिले. नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असल्यामुळे अविश्वास प्रस्तावर बारगळल्याचे तहसीलदार समथर यांनी घोषित केले. (तालुका प्रतिनिधी)