ॲसिड टाकून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:30+5:302021-07-14T04:40:30+5:30
तो गोंदियातील एका ड्रायव्हिंग स्कूल येथे कामावर होता. त्याने एका वाहनाचा अपघात केल्याने त्या अपघातातील वाहन दुरुस्त करायला मालकाला ...

ॲसिड टाकून तरुणाचा खून
तो गोंदियातील एका ड्रायव्हिंग स्कूल येथे कामावर होता. त्याने एका वाहनाचा अपघात केल्याने त्या अपघातातील वाहन दुरुस्त करायला मालकाला दीड लाखांचा खर्च आला. मालकाने त्याच्यावर दीड लाख रुपये रुपयाचे नुकसान झाले ते परत कर म्हणून त्याच्याकडे तगादा लावला होता. त्यात मालकासोबत त्याचा वाद झाला. त्यातील एक लाख रुपये कुलदीपचे वडील हिरालाल बिसेन यांनी ड्रायव्हिंग स्कूल मालकाला परतही केले. परंतु ५० हजार रुपये परत केले नाही म्हणून मालक त्याच्यासोबत वाद करायचा. या रकमेचा हिशेब करून त्यानंतर आपल्यावर येणारे पैसे देईल, असे म्हणून कुलदीप ७ जुलै रोजी ड्रायव्हिंग स्कूलचे मालकाला भेटायला गेला होता. तिथूनच तो बेपत्ता झाल्याचा आरोप मृतकाचे वडील हिरालाल बिसेन करीत आहेत. कुलदीप मालकाला भेटण्यासाठी इवेंजर (एमएच ३५ झेड ४८६४) या वाहनाने गेला होता. ते वाहन कोठारी गॅस एजन्सी या गोदामात समोरील जंगलात उघड्यावर उभे दिसले. नागरिकांच्या लक्षात हे वाहन पाच दिवसांपासून तिथेच उभे असल्याने याची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळला. कुलदीपवर ॲसिड टाकून त्याचा खून करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.