धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, वादातून घडले हत्याकांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 22:12 IST2020-09-25T22:12:26+5:302020-09-25T22:12:32+5:30
भंडारा : क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादात एका ३० वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धरमपाल रामदास वैद्य असे ...

धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, वादातून घडले हत्याकांड
भंडारा : क्षुल्लक कारणावरून घडलेल्या वादात एका ३० वर्षीय तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धरमपाल रामदास वैद्य असे मृत तरूणाचे नाव आहे. ही घटना भंडारा शहरातील कस्तुरबा गांधी वॉर्डातील टप्पा मोहल्ल्यात दुपारच्या सुमारास घडली.
भंडारा पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले असून एका आरोपीच्या शोधात नागपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आले आहे. रोशन रमेश कटारे व रवी रमेश कटारे अशी भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे आहेत. तर पसार झालेला अनिकेत कोकाटे याच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.
भंडारा बसस्थानकाच्या मागील परिसर टप्पा मोहल्ला म्हणून ओळखला जातो. माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास दोन महिलांचा वाद सुरू झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. याचवेळी धारदार शस्त्राने धरमपाल यांच्यावर वार करण्यात आले. गंभीर अवस्थेत धरमपाल याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक लोकेश काणसे यांच्यासह चमूने घटनास्थळी भेट दिली. यात कारवाईची सुत्रे जलद गतीने हाताळून दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत भंडारा शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्यासह पोलीस निरीक्षक व अन्य सहकाºयांची बैठक सुरू होती. पसार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ पथक पाठविल्याचे पोलीस निरीक्षक गजानन कंकाळे यांनी सांगितले.
--------
खून प्रकरणात आरोपींचा शोध घेवून फौजदारी प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
-लोकेश काणसे,
पोलीस निरीक्षक भंडारा.