शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत सराईत चोरट्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले. मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्याने काहीवेळातच चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचवेळी बाजूला असलेला मोठा दगड तीनदा त्याच्या डोक्यात घालण्यात आला.

ठळक मुद्देपाच जणांना तासाभरात अटक : तलवारीने वार व डोक्यात घातला दगड

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : चोरीचे अनेक गुन्हे शिरावर असलेल्या सराईत चोरट्याचा जुन्या वैमनस्यातून तलवारीने वार व डोक्यात दगड घालून खून करण्याची घटना मोहाडी येथे गुरूवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणात अवघ्या तासाभरात पाच जणांना अटक केली. लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या घटनेने मोहाडी शहरात खळबळ उडाली.चंद्रशेखर ऊर्फ रवरान काशीनाथ निपाने (३५) रा. टिळक वॉर्ड मोहाडी असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राहूल मनोहर हेडाऊ (१९), आनंद मनोहर हेडाऊ (२०) रा. गांधी वॉर्ड, उमेश झाडू मारबते (२०), दिनेश झाडू मारबते (२५) आणि नितीन नरेश मारबते (२३) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्रशेखर निपाने आणि आरोपींमध्ये जुन्या वैमनस्यातून नेहमी वाद होत होता. तो या आरोपींना धमक्या देवून मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा चंद्रशेखरने उमेश मारबते याला बेदम मारहाण केली. त्यामुळे या पाच जणांनी मिळून त्याचा काटा काढण्याचे ठरविले.तलवार घेवून ते पाच जण शहरातील इंदिरा वॉर्डातील मोबाईल टॉवरजवळ लपून बसले. रात्री ८.३० वाजता चंद्रशेखर तेथे येताच पाच जणांनी अचानक चंद्रशेखरच्या गळ्यावर तलवारीने वार केला. यावेळी झालेल्या झटापटीत तीन आरोपीही जखमी झाले.मात्र तलवारीचा वार गळ्यावर लागल्याने काहीवेळातच चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचवेळी बाजूला असलेला मोठा दगड तीनदा त्याच्या डोक्यात घालण्यात आला. त्यामुळे चंद्रशेखरचा जागीच मृत्यू झाला. मरण पावल्याची खात्री केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.या घटनेची माहिती होताच परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली. मोहाडी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार निशांत मेश्राम तात्काळ पथकासह घटनास्थळावर पोहचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मात्र नेमका कोणी आणि कशासाठी खून केला हे सुरूवातीला कळायला मार्ग नव्हते. मात्र ठाणेदार मेश्राम यांनी तपासाचे चके्र फिरवून पाचही आरोपींना अवघ्या तासभरातच जेरबंद केले.चंद्रशेखर हा सराई चोरटा गुंड प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर चोरी व मारहाणीचे अनेक गुन्हे आहेत. मोहाडी येथील एका सोनाराचे सोने लुटून रायपूर येथे विकताना त्याला दोन वर्षापुर्वी अटक करण्यात आली होती. तसेच मोहाडी येथील एका मोठ्या चोरीतही त्याला अटक झाली होती. या घटनेचा तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण जाधव करीत आहेत.आरोपी एमआयडीसी परिसरात बसले लपूनखून करून पसार झालेले हे पाचही जण मोहाडी एमआयडीसी परिसरात लपून बसले होते. पोलिसांना याची माहिती होताच तेथून त्यांना अटक करण्यात आली. जुन्या वैमनस्यातून आपण खून केल्याची कबूली त्यांनी पोलिसांपुढे दिली. या पाच जणांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता नितीन मारबते, उमेश मारबते व दिनेश मारबते यांना मार लागल्याचे दिसून आले. तर राहूल आणि आनंद हेडाऊ या दोघांना न्यायालयापुढे हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. उर्वरित तिघांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून शुक्रवारी सायंकाळी अटक केली.

टॅग्स :MurderखूनThiefचोर