भंडारा शहरातील २१ धोकादायक इमारतींना नगरपरिषदेने बजावली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:49+5:302021-06-09T04:43:49+5:30
बॉक्स नगरपरिषदेने इमारत मालकांना बजावली नोटीस भंडारा नगरपरिषदेने शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी केली असून अशा २१ धोकादायक इमारत मालकांना ...

भंडारा शहरातील २१ धोकादायक इमारतींना नगरपरिषदेने बजावली नोटीस
बॉक्स
नगरपरिषदेने इमारत मालकांना बजावली नोटीस
भंडारा नगरपरिषदेने शहरातील धोकादायक इमारतींची पाहणी केली असून अशा २१ धोकादायक इमारत मालकांना नगरपरिषदेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच कोणतीही जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे कळवले आहे. भंडारा शहरात जुन्या भंडारा म्हणजे पोस्ट ऑफिस चौक ते गांधी चौकापर्यंत आजही काही इमारती जुन्या आहेत. या इमारती मोडकळीस आल्याने पावसाळ्यात अशा इमारतींना पडण्याचा धोका वाढला आहे.
बॉक्स
इमारत पडल्यास जबाबदार कोण?
भंडारा शहरात काही दिवसांपूर्वी ऑनलाइन घरटॅक्ससाठी प्रत्यक्ष शहरातील इमारतींचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये घर एकमजली की दुमजली, घर किती स्क्वेअर फुटामध्ये बांधकाम आहे, किती मजली आहे अशी सर्व माहिती भंडारा नगरपरिषदेने संकलित केली आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडे धोकादायक इमारतींचा डाटा उपलब्ध असल्याने अशा धोकादायक इमारत मालकांना नगरपरिषदेतर्फे नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच वृत्तपत्रांमधूनही याबाबतचे माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अशा इमारती पडल्या त्याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहणार नसल्याची माहिती आहे.
कोट
सारे काही कळते, पण कुठे जाणार..
सध्या कोरोना संकटामुळे रोजगाराची चिंता सतावत आहे. आमची घरे जुनी आहेत. मात्र आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. लवकरच घराचे बांधकाम करणार आहोत.
- इमारत मालक, भंडारा
कोट
भंडारा शहरातील मध्यवर्ती भागात माझे घर आहे. हे घर जुन्या पद्धतीचे बांधकाम आहे. आज अशा बांधकामाची दुरुस्तीकरता मजूर येत नसल्याने घराचे नव्यानेच बांधकाम करावे लागणार आहे. मात्र माझ्याकडे सध्या तेवढे पैसे नसल्याने काम करता येत नाही.
- इमारत मालक, भंडारा
कोट
मुख्याधिकारी जाधव साहेबांच्या मार्गदर्शनात भंडारा शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. जुन्या धोकादायक इमारत मालकांना नगरपरिषदेतर्फे नोटीस बजावली आहे. काही घरमालकांना प्रत्यक्ष जाऊन मार्गदर्शन केले आहे. नगरपरिषदेतर्फे सर्व सहकार्य केले जात आहे.
- मुकेश कापसे, नगररचनाकार, नगररचना विभाग, भंडारा