शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
7
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
8
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
9
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
10
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
11
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
12
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
13
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
14
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
15
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
16
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
17
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
18
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
19
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
20
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...

चिखला, नाकाडोंगरीतील शेकडो झाडे मृत्यूच्या दाढेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 21:59 IST

एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाचा अभाव : सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एकच लक्ष्य ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनखात्याने उचलला आहे. परंतु सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन, संगोपन, व देखभालीकरीता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन न दिल्याने शेकडो झाडे मरणासन्न स्थितीत आली आहेत. हा सर्व प्रकार तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी- कवलेवाडा रस्त्याशेजारी दिसत आहे.सामाजिक वनीकरण, वनविभाग तथा ग्रामपंचायतीतर्फे रिकाम्या, पडीक जागेवर वृक्ष लागवड मोहीम संपूर्ण राज्यात राबविली जात आहे. ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प वनविभागाने केला आहे. राज्याच्या वनमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सामाजिक वनिकरण खात्यातर्फे तुमसर तालुक्यातील चिखला-सितासावंगी व नाकाडोंगरी-कवलेवाडा रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तीन ते पाच किमीच्या हा संपूर्ण परिसर आहे. वृक्ष लागवड करतांनी दोन ते तीन फुट अशी मोठी वृक्ष लावण्यात आली. वृक्ष लगावड केल्यानंतर शेकडो झाडे शेवटची घटना मोजत आहेत. वृक्ष लागवडीनंतर या झाडाकडे कुणी ढूंकून पाहिले नाही असे दिसून येते. माकडांनी या वृक्षांच्या अक्षरश: फडशा पाडल्या आहेत. संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. वृक्षांना नविन पालवी आल्यानंतर माकडांनी ती फस्त केली. वरची पालवी माकडांनी खाल्ल्याने केवळ मध्यभागी काडीवजा झाड तेवढे उभे आहे. जंगलव्याप्त परिसरात नविन झाडे माकडांचे खाद्य येथे ठरले आहे. वृक्ष लागवडीनंतर झाडांचे संरक्षणाकरिता येथे मनुष्यबळ उपलब्ध नाही.२०० झाडांकरीता एक चौकीदार असा नियम आहे, परंतु सामाजिक वनीकरणात सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. या संदर्भात सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावर मनुष्यबळ वरिष्ठ स्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात आले नाही. मनुष्यबळाकरिता स्वतंत्र निधी सामाजिक वनीकरणाने उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.शासनाने वनविभाग ग्रामपंचायत व सामाजिक वनीकरणाने स्थानिक लोकसहभागातून झाडे संवर्धन करावी असे सांगण्यात येते, परंतु लोकसहभाग स्थानिक पातळीवर नगण्य आहे. ज्या विभागाने वृक्ष लागवड केली त्यांची जबाबदारी येथे ठरविण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असल्याने संबंधित खात्याचा त्यात नाईलाज आहे.केवळ वृक्ष लागवड करुन आकडे फुगवून सांगण्यात अर्थ नाही, तर शेकडो झाडे जीवंत ठेवून ती वाढली पाहिजे. तेव्हाच प्रत्यक्षात जंगल तयार होऊन पर्यावरणाचे रक्षण होईल. याकरिता शासनाने प्रत्यक्षात प्रभावी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे.- डॉ. पंकज कारेमोरे, युवा काँग्रेस नेते, तुमसर