शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

चिखला खाणीत रेतीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:04 IST

केंद्र शासनाच्या भूमीगत चिखला खाणीत मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढलेल्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देखाण परिसरात रेतीचे साठे : बावनथडी नदी घाटातून लीज

मोहन भोयर।आॅनलाईन लोकमततुमसर : केंद्र शासनाच्या भूमीगत चिखला खाणीत मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढलेल्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येत आहे. लाखो ब्रास रेती आतापर्यंत यासाठी वापरण्यात आली आहे. मॉईल प्रशासनाने बावनथडी नदी पात्रातून रेतीची लीज घेतली आहे. ब्रिटीश काळापासून रेतीचा भराव हा प्रकार सुरुच आहे. दुसरीकडे उड्डाणपुलाच्या बांधकामात वीज कारखान्यातील अ‍ॅशचा वापर केला जात असताना भूमीगत खाणीत त्याचा वापर का नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यातील चिखला येथे ब्रिटीशकालीन भूमीगत मॅग्नीज खाण आहे. या खाणीतून मॅग्नीज काढल्यानंतर विहिरीसारखे खड्डे पडतात. भूस्खलन होऊ नये याकरिता त्या खड्ड्यात रेतीचा भरणा करण्यात येतो. मॉईल प्रशासनाने रेती भरण्याकरिता बावनथडी नदी पात्रातील लीज शासनाकडून घेतली आहे. चिखला खाण परिसरात रेतीचे साठे आहेत. दरदिवशी किमान १०० ट्रक मॅग्नीज भूगर्भातून काढण्यात येते. तेवढीच रेती तिथे भरावाकरिता वापरली जाते. चिखला खाण परिसरात मिनी रेती घाट तयार झाला आहे. केंद्र शासनाने पर्यायी भरणाचा पर्याय येथे शोधण्याची निश्चितच गरज होती. नदी पात्रात पूर्वीसारखी रेती उपलब्ध नाही. त्यामुळे रेतीचा भरणा करणे परवडणारे नाही. उड्डाणपुल बांधकामात माती मुरुमाचा भरणा यापूर्वी करण्यात येत होता. सध्या वीज कारखान्यातील अ‍ॅशचा वापर केला जातो.सिमेंट कारखान्यात या अ‍ॅशचा वापर केला जातो. अ‍ॅश मजबूत व सिमेंटसारखी मजबूत आहे. केंद्र तथा राज्य शासनाने अ‍ॅशच्या वापराची परवानगी दिली आहे. उड्डाणपुलावरून जड वाहतूक २४ तास सुरु असते. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. मॉईल खाणीत भराव केल्यास लाखो ब्रास रेती वाचू शकते.चिखला भूमीगत खाणीत बावनथडी नदी पात्रातून रेती आणली जाते. येथे मॉईल प्रशासनाने लीज घेतली आहे. रेतीचा भरावाकरिता उपयोग केला जातो. केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच कार्य सुरू आहे.-रुहुल अमीन शेख,व्यवस्थापक चिखला खाण