सनफ्लॅग कामगारांचे आंदोलन
By Admin | Updated: December 11, 2014 23:01 IST2014-12-11T23:01:28+5:302014-12-11T23:01:28+5:30
मागील नऊ महिन्यांपासून सनफ्लॅग आर्यन अॅण्ड स्टिल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंपनीत निषेध आंदोलन सुरू आहे. सदर मागण्या नियमानुसार असतानाही

सनफ्लॅग कामगारांचे आंदोलन
वरठी : मागील नऊ महिन्यांपासून सनफ्लॅग आर्यन अॅण्ड स्टिल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगाराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंपनीत निषेध आंदोलन सुरू आहे. सदर मागण्या नियमानुसार असतानाही सनफ्लॅग व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप मजदुर सभा व कंत्राटी कामगार संघटनेने केला आहे.
सनफ्लॅग कंपनीत २१०० कामगार कार्यरत आहेत. यात १२०० कंत्राटी कामगार, ५०० स्थायी कामगार असून पदोन्नती मिळवून व्यवस्थापन विभागात ४०० कामगार कार्यरत आहेत. दर तीन वर्षानी स्थायी व कंत्राटी कामगारांना नियमित पगारवाढ व सानुग्रह राशी देण्याचा करार करण्यात येतो. नियमानुसार सदर करार हा मागील करारापेक्षा वाढून व कंत्राटी कामगारासाठी राज्य शासनाच्या वेतनानुसार देणे बंधनकारक आहे.
यापुर्वीचा करार २०११ मध्ये झाला होता. त्यानुसार सनफ्लॅग कंपनीत कार्यरत स्थायी कामगारांना त्यांच्या श्रेणीनुसार तीन वर्षाकरीता टप्प्याटप्प्याने ६,२५० रूपये पगारवाढ व बोनस आणि सानुग्रह राशी २२,२५० देण्यात आले होते. ३१ मार्च २०१४ मध्ये हा करार संपुष्ठात आला. त्यानुसार पुढील तीन वर्षासाठी करार करण्यासंदर्भात कामगार संघटनानी सनफ्लॅग व्यवस्थापनाला ही मागणी करण्यात आली. त्यावर चर्चा न करता सनफ्लॅग व्यवस्थापन पळवाटा काढत असल्याचा आरोप केला आहे.
सनफ्लॅग व्यवस्थापनाच्या दुर्लक्षित धोरणाला कंटाळून कामगार संघटनानी ४ डिसेंबरला काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. ५ डिसेंबरपासून सनफ्लॅग कंपनीत आंदोलन सुरू आहे. परंतु तोडगा निघाला नाही. सनफ्लॅग व्यवस्थापन चर्चेत तयार नसल्यामुळे भविष्यात कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक यांनी दिला आहे. यावेळी महासचिव किशोर मारवाडे, उपाध्यक्ष विजय बांडेबुचे, विजेंद्र नेमा, महेश बर्वेकर, रवि बोरकर, विकास फुले, अमोद डाकरे, कंत्राटी कामगार संघटनेचे शैलेंद्र बंसोड, मनोहर डोंगरे, संतोष बालपांडे, विनोद साठवणे, रमेश बालपांडे उपस्थित होते.
कामगार मंत्र्यांचे आश्वास्त
सनफ्लॅग कंपनी व्यवस्थापनाच्या अडेलतट्टु धोरणाने त्रस्त कामगार संघटनानी कामगार मंत्री विजय देशमुख यांच्याशी भेट घेऊन प्रकरण लक्षात आणून दिले. कामगाराच्या मागण्यासंदर्भात त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन अप्पर कामगार आयुक्तांना बैठकीसाठी बोलवणार आहेत. (वार्ताहर)