मुद्रांक विकेत्यांचे लेखणी बंद आंदोलन
By Admin | Updated: February 13, 2015 00:59 IST2015-02-13T00:59:00+5:302015-02-13T00:59:00+5:30
मुद्रांक विक्रेत्यांनी केवळ एक हजाराच्या आतच मुद्रांकाची विक्री करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेत्यांवर गडांतर येवून त्यांच्या कुटूंबियावर ...

मुद्रांक विकेत्यांचे लेखणी बंद आंदोलन
तुमसर : मुद्रांक विक्रेत्यांनी केवळ एक हजाराच्या आतच मुद्रांकाची विक्री करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्याने मुद्रांक विक्रेत्यांवर गडांतर येवून त्यांच्या कुटूंबियावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्या निषेधार्थ मुद्रांक विक्रेता संघटनेने गुरूवार व शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर मुद्रांक विक्री व दस्त लेखनी बंद आंदोलन सुरू केले आहे.
जानेवारी २०१५ रोजी शासकीय आदेशान्वये मुद्रांक विक्रेत्यांना यापुढे केवळ १०० रूपये तथा ५०० रूपये मुल्यवर असलेल्या मुद्रांकाचीच विक्री करता येईल. त्यापुढील मूल्यदरांच्या मुद्रांकांचे शुल्क संबंधित ग्राहकांनी ई चालानद्वारे सरळ शासनाच्या तिजोरीत जमा करावे, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. यामुळे मुद्रांक विक्रेता एका दिवसात केवळ ३० ते ४० रूपयेच कमावू शकणार आहे.
भंडारा जिल्ह्यात सुमारे ३०० मुद्रांक विक्रेते आहेत. सुरूवातीला ६०० रूपयापर्यंतच्या मुद्रांक विक्रीची मर्यादा होती. पुढे ३० हजार रूपयापर्यंत मुद्रांक विक्रीची मर्यादा करण्यात आली. केवळ ३ टक्के कमीशन घेवून मुद्रांक विक्रेते व्यवसाय करीत उदरनिर्वाह चालवित आहेत. आंदोलनात अध्यक्ष धनवंत कठाणे, सचिव राम बिसने, देवेंद्रकुमार मोहबे, हरिश्चंद्र सोनकुसरे, आनंद बिसने, दिनेश भवसागर, संगीता जैन, धनराज गभने, अशोक नारसाटे, संजय अटराये, कृष्णा वासनिक, महेश निमजे, सुधीर बागडे, उदयभान लांजेवार, मिलिंद मेश्रामसह मुद्रांक विक्रेते सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)