आईचे नाव बंधनकारक पण अंमलबजावणी कधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:31 PM2024-05-14T13:31:34+5:302024-05-14T13:32:17+5:30

Bhandara : आता सर्व महत्वाच्या कागदपत्रांवर लागणार आईचे सुद्धा नाव

Mother's Name Mandatory But When Implementation? | आईचे नाव बंधनकारक पण अंमलबजावणी कधी?

Mother's Name Mandatory But When Implementation?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
शासनाने १ मेपासून कागदपत्रांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आलेले असले तरी अद्याप जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमधून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली नाही. सर्व कार्यालयांनी शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी १४ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार, आईचे नाव दस्तऐवजांमध्ये लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात यावी, असे आदेश शासनाने दिले होते. मात्र, या निर्णयामुळे अनेक कार्यालयांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झालेली असल्याचे दिसून येत आहे.


१ मेनंतर जन्मलेल्यांसाठी नियम लागू
■ शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सद्यःस्थितीला जे कागदपत्र आहे त्याच्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार नाही.
■ सध्याच्या कागदपत्रात कोणताच बदल करण्याची गरज नाही. १ मे २०२४ नंतर ज्या बालकांचा जन्म होईल, त्यांनाच हा निर्णय लागू असणार आहे.


कोणत्या कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार?
सरकारने कोणत्या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक राहणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये जन्माचा दाखला, शाळेत अॅडमिशन घेताना भरलेला अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्रे, जमिनीचा सातबारा उतारा, प्रॉपर्टीशी संबंधित डॉक्युमेंट, शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक, शासकीय तथा निमशासकीय कर्मचाऱ्यांची सॅलरी स्लिप, रेशन कार्ड आणि मृत्यूचा दाखला या शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

प्रशासनाकडून सूचना
■ शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत.
■ प्रशासनाकडून विविध विभागांना पत्र पाठवण्यात येत आहेत.

Web Title: Mother's Name Mandatory But When Implementation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.