आईचे महात्म्य कायम असावे

By Admin | Updated: May 10, 2015 00:54 IST2015-05-10T00:54:56+5:302015-05-10T00:54:56+5:30

आईचे महात्मय सांगण्यासाठी ‘मदर्स डे’ हा काही एका दिवसापुरता मर्यादित दिवस नाही.

Mother's dignity should be maintained | आईचे महात्म्य कायम असावे

आईचे महात्म्य कायम असावे


भंडारा : आईचे महात्मय सांगण्यासाठी ‘मदर्स डे’ हा काही एका दिवसापुरता मर्यादित दिवस नाही. आयुष्याच्या प्रत्येकच दिवशी तिचे महत्त्व समजायला लावणारा दिवस असला पाहिजे. कारण आपला जन्मच तिच्यामुळे झाला आहे, याची जाणीव ठेऊन एक दिवसाच्या महत्त्वापेक्षा दररोज आईची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे भावनिक मत जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी ‘मदर्स डे’च्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.
मूल जन्माला आल्यापासून आई हीच पहिली गुरु असते. तिच्या संस्कारातच मनुष्याची जडणघडण होत असते. मोठे बनल्यानंतर तिच्या संस्काराचे दायित्व निभावण्याची गरज आहे. आईने लहानपणापासूनच वेळेचे नियोजन शिकविले. वक्तशीरपणा, सातत्य, निरंतरता आणि सहनशीलता हे गुण तिनेच माझ्यात रुजविले. अभ्यासासाठी पहाटे उठण्याची सवय तिच्यामुळेच लागली. हस्ताक्षर, शुद्धलेखनाचे पाठ, सामाजिक बांधिलकी अशा विविध पायऱ्याही तिनेच शिकविल्या आहेत. लग्नानंतर आयएएस उत्तीर्ण झाले. आयएएसची तयारी करताना सासूबाईची प्रेरणा माझ्या यशात महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे सासूबाई यासुद्धा माझ्यासाठी आईच ठरली आहे.
अलिकडे फेसबुक, वॉटस्अ‍ॅप यासारख्या सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. आईवडिलांच्या या उतारवयात त्यांनाही जगात काय सुरु आहे, हे कळण्यासाठी यासाठी त्यांनाही यात सहभागी करुन घेतले पाहिजे. सेलीब्रेशन साजरे करताना आईवडिलांसोबत घेतले पाहिजे. त्यामुळे एक दिवसाच्या महत्त्वापेक्षा दररोज आईची कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस साजरा झाला पाहिजे, असेही डॉ. माधवी खोडे यांनी सांगितले.

Web Title: Mother's dignity should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.