शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
5
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
6
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
7
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
8
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
9
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
10
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
11
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
12
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
13
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
14
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
15
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
17
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
18
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
19
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
20
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?

अपघातात आई ठार, मुलगा गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : भरधाव ट्रक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी ...

ठळक मुद्देकुशारीची घटना : ट्रॅक्टरची मोटरसायकलला धडक

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : भरधाव ट्रक्टरने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात आई जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील कुशारी फाट्यावर सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.ताराबाई भुते (५०) रा. घाडकुरोडा ता. माहाडी असे मृत महिलेचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा अरविंद भुते (२३) जखमी झाला आहे. अरविंद हा आपल्या आई ताराबाई यांना घेऊन बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच ३६ एम ४७८९) मोहाडी येथील बँकेत येत होता. त्यावेळी कुशारी फाट्यावर मागून आलेल्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३६ डी ८१०९ ) मोटरसायकलला जबर धडक दिली. त्याम ताराबाई भूते यांच्या दोन्ही पायावरून ट्रॅक्टरचे चाक गेला. गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मुलगा अरविंद हा गंभीररित्या जखमी झाला.अरविंदला मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ट्रक्टर चालकानी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे करीत आहे. 

टॅग्स :Accidentअपघात