जुनाट वजनकाट्यांचा सर्रास वापर
By Admin | Updated: November 11, 2014 22:36 IST2014-11-11T22:36:14+5:302014-11-11T22:36:14+5:30
आठवडी बाजार, गुजरीमध्ये भाजीपाला विकत घेतानी तर व्यापाऱ्याकडे धान्य विकतानी जुनाट वजनकाट्यांचा वापर करुन ग्राहक आणि शेतकऱ्याची सर्रास लुट केल्या जात असल्याचा आरोप आहे.

जुनाट वजनकाट्यांचा सर्रास वापर
कऱ्हांडला : आठवडी बाजार, गुजरीमध्ये भाजीपाला विकत घेतानी तर व्यापाऱ्याकडे धान्य विकतानी जुनाट वजनकाट्यांचा वापर करुन ग्राहक आणि शेतकऱ्याची सर्रास लुट केल्या जात असल्याचा आरोप आहे. प्रमाणित न केलेले जुनाट काटे आणि वजनाचा वापर करुन फसवणूक करण्याचा प्रकार थांबेल काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाजारात, गुजरीमध्ये वापरत असलेले वजन जुनाट झालेले तसेच दगडाचा वापर वजन म्हणून करित असल्याने वस्तु घेताना ग्राहकांची निराशा होते. भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. किलोभर घेतला जाणारा भाजीपाला पावभर घेऊन दैनदिन गरज पूर्ण केली जाते. ग्राहक योग्य मोबदला देऊन माल विकत घेतो. तेव्हा योग्य वजन मिळणे हा त्याचा हक्क आहे.
डोकेसरांडी अथवा लाखांदूरचा आठवडी बाजार असो बहूतेक भाजीपाला आणि धान्य विकणारे तेच विक्रेते असतात बऱ्याच माल विक्रेत्याकडे नूतनीकरण केलेले वजन आणि काटा दिसत नाही. काहीची वजनाची परडी जंगलेली फुटलेली असल्याने वजनामध्ये तफावत असते. वजन मांडायच्या परडीत वजन कमी, माल माडायचा परडीचा वजन जास्त असतो. प्रत्येकांच्या काट्याला पासोग असतोच असे ग्राहकांचे म्हणणे आहे. पावभर माल देण्यासाठी बहुतेकांकडे ५० ग्रामचा वजन नसतो. त्याहीपेक्षा कमी माल घेण्याची वेळ आली तर २० ग्रॅम, २५ ग्रॅम वजन दिसतच नाही. अंदाजे तेवढ्या वजनाचा झुकता माल दिला म्हणून ग्राहकांचे समाधान केले जाते. माल मांडावयाच्या परडीच्या बाजूने वजनाचा काटा वाकलेला असतो तर काही वजनाचा काटा तुटलेला अशा संशयास्पद स्थितीमध्ये वजन काटा वापरला जातो. एखाद्या ग्राहकाने माल विक्रेत्याला वजनमापाच्या संदर्भात विचारणा केली तर ग्राहकालाच खोटे ठरविण्याचा प्रकार बघावयास मिळते.
हातात वजनकाटा धरुण माल जोराने परडीवर आदळून माडणे, झटका मारुन वजन करणे, हाताच्या तळभागाने दांडीला पुस करणे, तळहात दांडीला लावून ठेवणे, जादूच्या खेळाप्रमाणे हातसफाईने वजन केला जातो. मटणमच्छी बाजारातही वजन काट्याची तीच स्थिती आहे. या सर्व प्रकाराकडे विभाग संबंधित दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्याचे धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याचे देखील वजन काटा संशयास्पद असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नूतनीकरण केलेले वजनमाप लपवून ठेवून प्रमाणित न केलेल्या वजनमापाचा सर्रास वापर केला जात आहे. आठवडी बाजारामध्ये इलेक्ट्रानिक वजनकाटा वापरावर शक्ती करुन हातामध्ये तराजू धरण्यावर ब्ांदी घालावी. व्यापाऱ्यांनाही इलेक्ट्रानिक वजनकाटाचा वापराची शक्ती करुन ग्राहकांची सर्रास होणारी लूट थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. (वार्ताहर)