प्र्रचारात ‘मनीपॉवर’ भारी

By Admin | Updated: October 3, 2014 01:11 IST2014-10-03T01:11:56+5:302014-10-03T01:11:56+5:30

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ ११ दिवस उरले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमघ्ये प्रचाराचे संदर्भही बदललले आहेत.

'Moneypowers' in propaganda heavy | प्र्रचारात ‘मनीपॉवर’ भारी

प्र्रचारात ‘मनीपॉवर’ भारी

भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ ११ दिवस उरले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमघ्ये प्रचाराचे संदर्भही बदललले आहेत. निष्ठावान कार्यकर्ता घरी बसलेला आहे. प्रचाराची धुरा भाडोत्री कार्यकर्ते सांभाळत आहेत.
बहुतांश मतदारसंघांत उमेदवारांचे नातेवाईक प्रचाराचा भार वाहताना दिसत आहेत. सध्याच्या राजकारणात निष्ठा, विचार आदींची वाट लागली आहे. केवळ, मनीपॉवरचा बोलबाला आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांची चंगळ सुरू आहे. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. रॅली, प्रचारसभांसाठी रोजंदारीने कार्यकर्ते गोळा केले जात आहेत. नवख्या उमेदवारांसाठी हे वातावरण अडचणीचे आहे. सभा व रॅलींमध्ये ‘पेडवर्कर्स’ चा बोलबाला आहे. प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. प्रचारासाठी फिरल्यानंतर जेवणाची सोयदेखील उमेदवारांना करावी लागत आहे. अनेकांनी साडीचोळी, कुणी दिवाळीचा किराणा आदींची आमिषे दाखविली जात आहेत. त्यामुळे प्रचाराच्या नव्या ट्रेंडमध्ये सच्चा कार्यकर्ता दुरावला जात आहे.
दिवसभर प्रचार रात्री श्रमपरिहार
प्रचारासाठी असलेल्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार व रात्रीच्या जेवणाची व्यवस्था प्रत्येक मतदारसंघात करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या बडग्यामुळे वेगवेगळ््या ठिकाणी भोजनावळी सुरू आहेत. नवरात्रीमुळे शाकाहारी मात्र दसऱ्यानंतर मांसाहारी पाहुणचार मिळेल. कार्यकर्त्यांना त्या दिवसांची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Moneypowers' in propaganda heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.