घरफोडी करून ‘तो’ मुलींवर उधळायचा पैसा
By Admin | Updated: June 25, 2017 00:18 IST2017-06-25T00:18:03+5:302017-06-25T00:18:03+5:30
मुलींशी ओळख करायची, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्यावर पैसा खर्च करायचा. त्यासाठी लागणारा पैसा चोरी करून आणायचा, ...

घरफोडी करून ‘तो’ मुलींवर उधळायचा पैसा
१४ घरफोडीतील मुद्देमाल जप्त : अल्पवयीन मुलगा गुन्हे शाखेच्या ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मुलींशी ओळख करायची, त्यांच्यावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्यावर पैसा खर्च करायचा. त्यासाठी लागणारा पैसा चोरी करून आणायचा, अशी कबुली घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेल्या एका अल्पवयीन मुलाने दिली.
मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी झालेल्या घरफोडीतील एक अल्पवयीन मुलगा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्याची चहुबाजूने चौकशी केली असता त्याने ही कबुली दिली. भंडारा येथील राजेंद्र वॉर्डातील झोपडपट्टीतील एक अल्पवयीन मुलगा हा रात्री - बेरात्री बाहेर फिरत असतो तसेच मुलांना पैसे दाखवितो या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बालकावर लक्ष केंद्रीत करून त्याला पुराव्यासह पकडण्याकरीता सापळा रचला. या सापळयात हा मुलगा गुन्हे शाखेच्या पथकाला मुद्देमालासह सापडला. त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने जवाहरनगर, तुमसर, लाखनी, वरठी, कारधा, आंधळगाव, पवनी व तुमसर या ठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले. त्यावेळी चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या एक अल्पवयीन मुलाचे अनेक मुलींशी संबंध असल्याने तो त्यांना महागडे गिफ्ट खरेदी करून देणे. बाहेर हॉटेलमध्ये पैसे उडविण्यासाठी घरफोडी केल्याचे कबुल केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, पोलीस हवालदार राजेश गजभिये, बंडू नंदनवार, सावन जाधव, पोलीस नाईक रोशन गजभिये, क्रिष्णा बोरकर, दिनेंद्र आंबेडारे, बबन अतकरी, पोलीस शिपाई रमाकांत बोदरे, स्नेहल गजभिये, कौशीक गजभिये, अनुप वालदे, कुणाल कडव, चेतन पोटे यांनी केली.
पालकांनी मुलांच्या घराबाहेरील हालचालींवर करडी नजर ठेऊन आधुनिक यंत्रणेचा पाहिजे तेवढाच वापर हा करण्यासाठी निर्बध घालण्याची गरज आहे. त्यांच्यावर कुटुंबीयांची पाळत आहे, असा भीती असणे गरजेचे आहे.
- विनीता साहू,
पोलीस अधीक्षक भंडारा.