श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:38 IST2019-03-05T21:37:28+5:302019-03-05T21:38:03+5:30
केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.
केंद्र सरकारच्या वतीने अर्थ संकल्पात ६० वर्ष वयाच्या असंघटीत कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपए निवृत्ती वेतनाची हमी देणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, हया योजनेचा शुभारंभ मंगळवारला करण्यात जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अवघ्या काही दिवसातच या योजनेसाठी भंडारा जिल्हयात आठ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ही नोंदणी प्रक्रीया अशीच सुरू ठेवून नागरिकांना पेन्शन मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सीएससी व आपले सरकार सेवा केंद्राचे माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य) मंजूषा ठवकर, प्रवर्तन अधिकारी (भविष्य निर्वाह निधी) अमित आहूजा, संतोष पोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाच्छापूरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी नितीन फुके, उप कार्यक्रम व्यवस्थापक खोब्रागडे, आपले सरकार केंद्र (पंचायत) जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले आदींची उपस्थिती होती.जगताप म्हणाले, महिलांमध्ये पैसे बचत करण्याच्या अजूनही विविध पध्दती आहेत, त्या पध्दतीचा फायदा त्यांच्या कुटुंबियांना होतो. परंतु ज्या कामगारांचे पंधरा हजाराचे आत उत्पन्न आहे अशा, असंघटीत कामगारांसाठी अशा प्रकारची योजना नव्हती, परंतु केंद्र शासनाचे पुढाकारातून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही योजना सर्वांना उपयोगी पडेल अशी महत्वाची आहे. ग्रामीण भागात रोजी रोटी करणाऱ्या महिला अजूनही पगार, मजूरी आपल्या नवऱ्याच्या हातात देतात. परंतु कुटूंबात पैसाबाबत एखादी अडचण निर्माण झाली तर त्या पैशाचा मात्र पुरूषांकडे हिशोब नसतो, विविध कामांवर तो खर्च झालेला असतो. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी कुणीही धावून येत नाहीत, असे अनेक प्रसंग ऐकायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थतीत या योजनेचा फायदा कामगारांना बहुमौलाचा ठरणार आहे.