शिकवणी वर्गात विद्यार्थिनीचा विनयभंग
By Admin | Updated: May 11, 2016 00:48 IST2016-05-11T00:48:16+5:302016-05-11T00:48:16+5:30
येथील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षकाने विद्यार्थिनीशी प्रेमाचे चाळे करून विनयभंग केल्याची घटना घडली.

शिकवणी वर्गात विद्यार्थिनीचा विनयभंग
साकोली पोलिसात तक्रार : विनयभंग करणारा शिक्षक फरार
साकोली : येथील एका खासगी शिकवणी वर्गात शिक्षकाने विद्यार्थिनीशी प्रेमाचे चाळे करून विनयभंग केल्याची घटना घडली. पीडित मुलीच्या तोंडी तक्रारीवरुन पोलिसांनी शिक्षकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा शिक्षक फरार असून साकोली पोलीस त्या शिक्षकाचा शोध घेत आहे.
रेजोनंद टयुशन क्लासेस साकोली येथे चंद्रशेखर मारोती कापगते (२४) रा. बोळदे या शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीला शिकवणी वर्ग सुटल्यानंतर भेट, असे म्हणून थांबविले. शिकवणी वर्गातील सर्व विद्यार्थी गेल्यावर संधी पाहून या शिक्षकाने तिला एकटे बोलावून तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेऊन विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन साकोली पोलिसांनी चंद्रशेखर कापगते या शिक्षकाविरूध्द भांदवि ३५४ अ (१) सह कलम ८ बाल लैगिक प्रतिबंधक कायदा २०१२ या कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. शिक्षक सध्या फरार आहे. (तालुका प्रतिनिधी)