मॉईल प्रशिक्षणार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: July 13, 2015 00:45 IST2015-07-13T00:45:41+5:302015-07-13T00:45:41+5:30
भारत सरकारच्या डोंगरी बु. येथे प्रशिक्षणार्थी युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

मॉईल प्रशिक्षणार्थ्याची आत्महत्या
तीन महिन्यातील दुसरी घटना : आत्महत्येचे कारण कळले नाही
तुमसर : भारत सरकारच्या डोंगरी बु. येथे प्रशिक्षणार्थी युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत प्रशिक्षणार्थ्याचे नाव आशिष अशोक खैरवार (२२) रा. सिंडिकेट कॅम्प, डोंगरी बु. असे मृताचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली.
आशिष अशोक खैरवार हा सिंडिकेट कॅम्प माईन्समध्ये प्रशिक्षणार्थी होता. शनिवारी सायंकाळी तो घरुन फिरायला जातो असे घरी सांगून गेला. रात्री घरी तो परत आला नाही. म्हणून घरच्या मंडळीनी शोधाशोध केली. रविवारी ११.३० वाजताच्या सुमारास आशिषचे प्रेत जिल्हा परिषद शाळेजवळ एका झाडाला लटकलेले दिसले.
आशिषचे वडील अशोक खैरकर सिंडिकेट माईन्समध्ये कार्यरत आहेत. आशिष काही महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून माईन्समध्ये कार्यरत होता. आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. गोबरवाही पोलीसांनी मर्ग दाखल केला आहे. सुमारे तीन ते चार महिन्यापूर्वी एका प्रशिक्षार्थ्यांने येथे आत्महत्या केली होती. येथे प्रशिक्षणार्थी युवक तणावात वावरतात काय? याचा शोध घेण्याची गरज आहे. प्रशिक्षणार्थी युवकांची मॉईल प्रशासन शारीरिक व मानसिक चाचण्या घेतात हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)