मोकाट कुत्र्याचा ११ बालकांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:37+5:30
पालकांत भीतीचे वातावरण पसरले असून सर्व बालकांवर वरठीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. वरठीतील आठवडी बाजार परिसर, सुभाष वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, डॉ.आंबेडकर वॉर्ड, नेहरु वॉर्ड आणि हनुमान वॉर्डात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरु आहे. रविवारी यातीलच एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठवडी बाजारात आलेल्या दोन बालकांवर हल्ला चढविला.

मोकाट कुत्र्याचा ११ बालकांना चावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : मोकाट कुत्र्यांनी वरठीत गत काही दिवसांपासून धुमाकुळ घातला असून गत दोन दिवसांपासून पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्याने तब्बल ११ बालकांना चावा घेतला. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले असून सर्व बालकांवर वरठीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
वरठीतील आठवडी बाजार परिसर, सुभाष वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, डॉ.आंबेडकर वॉर्ड, नेहरु वॉर्ड आणि हनुमान वॉर्डात काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरु आहे. रविवारी यातीलच एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठवडी बाजारात आलेल्या दोन बालकांवर हल्ला चढविला. तर सोमवारी सकाळी पुन्हा या कुत्र्याने धमाकुळ घालणे सुरु केले. कुवर श्रीवास्तव (१३), सचिन माळवे (१३), कृष्णदास (१३), आरव सक्सेना (१८ महिने), स्पर्श खोब्रागडे (२), गौरी कारेमोरे (४), सनया उके (१८ महिने), आलिया बोदिले (३), आदेश हिंगे (१४) या बालकांसह शुद्धोधन बोरकर (४८) आदी कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. सर्व बालकांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरु असून वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास मेश्राम बालकांवर उपचार करीत आहेत. यावेळी संजय मिरासे, गुड्डू काकडे, सूर्यकांत झलके उपस्थित होते.
आठवडी बाजार धोकादायक
आठवडी बाजार परिसरात या मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक धुमाकुळ सुरु आहे. बाजारातील विक्रेत्यांनी फेकलेल्या मांसाच्या तुकड्यांवर हे कुत्रे ताव मारतात. आता हे कुत्रे आक्रमक झाले असून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर तुटून पडतात. लहान मुले यात सर्वाधिक जखमी झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांसह दोन दिवसांपासून धुमाकुळ घालणाºया, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आहे.