मोहाडीत ओबीसींचे धरणे
By Admin | Updated: August 30, 2014 23:28 IST2014-08-30T23:28:10+5:302014-08-30T23:28:10+5:30
स्वातंत्र्योत्तर काळानंतरही ओबीसी समाज बांधवांना आरक्षणाचाी लाभ मिळाला नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्या विविध मागण्यासाठी ओबीसी सेवा संघाच्या

मोहाडीत ओबीसींचे धरणे
भंडारा : स्वातंत्र्योत्तर काळानंतरही ओबीसी समाज बांधवांना आरक्षणाचाी लाभ मिळाला नाही. त्यामुळे ओबीसी समाज बांधवांची परिस्थिती हलाखीची आहे. त्यांच्या विविध मागण्यासाठी ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून मोहाडी येथे तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
ओबीसींचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक परिस्थिती सुधारावी व ते अन्य समाजाच्या तुलनेत मुख्य प्रवाहात यावे यासाठी कित्येक वर्षापासून राज्य कर्त्यांकडे निवेदने देण्यात येत आहे. मात्र ओबीसींना आरक्षणाच्या सवलतीपासून डावलण्यात येत असल्याचा आरोप ओबीसी बांधवांनी केला आहे. त्यामुळे आरक्षणासह विविध मागण्यासांठी मोहाडी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे देण्यात आले.
यात ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, नॉनक्रिमिलेअरची अट रद्द करावी, जातीनिहाय जनगणना, जिल्हास्तरावर वस्तीगृहाची व्यवस्था, एमपीएससी, युपीएससी मार्गदर्शन केंद्र चालवावे यासह अन्य मागण्यांना घेवून हे धरणे देण्यात आले. यावेळी धरणे आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दिनेश बालपांडे, हर्षदा शिवनकर, महेंद्र गोबाडे, ज्योती मलोडे, आशिष ईश्वरकर, मंगेश वैद्य, भारत मते, गोपाल सेलोकर, दयाराम आकरे, अर्जून सूर्यवंशी, दिपाली हटवार, हर्षा हलमारे, संगीता हलमारे, भाग्यश्री बारई, शितल ठोकरीमारे, प्रियंका आंबिलढुके, माधुरी बाभरे, सुनिल रोकडे, विश्वास बडवाईक, सचिन घडूले, अतुल झंझाड यांनी केले. (शहर प्रतिनिधी)