मोदी लाटच ठरली प्रभावी
By Admin | Updated: October 19, 2014 23:16 IST2014-10-19T23:16:06+5:302014-10-19T23:16:06+5:30
राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला कंटाळलेल्या नागरिकांवर मोदी यांच्या लाटेचा सकारात्मक परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीत या लाटेमुळे राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा

मोदी लाटच ठरली प्रभावी
भंडारा : राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला कंटाळलेल्या नागरिकांवर मोदी यांच्या लाटेचा सकारात्मक परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीत या लाटेमुळे राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांचा पराभव झाला होता. ही लाट ओसरल्याचे आघाडीच्या नेत्यांकडून बोलले जात होते. परंतु स्पष्ट कौल देऊन लाट कायम असल्याचे दाखवून दिले.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रचार केला. त्यांच्याव्यतिरीक्त राज्यातील एकही नेते प्रचारासाठी आले नव्हते. भंडारा आणि साकोली क्षेत्रात मतदारांनी नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर गेली. दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचारासाठी एकही मोठा नेता प्रचारासाठी जिल्ह्यात आलेला नव्हता. साकोली क्षेत्रात सेवक वाघाये यांनी कार्यकर्त्यांच्या बळावर सर्वाधिक ५५ हजारांवर मते काँग्रेसच्या झोळीत टाकले. भंडारा क्षेत्रात काँग्रेसची धुरा माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे सांभाळली होती. त्यातुलनेत भाजपच्या स्टार प्रचारकांनी जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघ पिंजून काढले. याशिवाय भाजपशासित राज्यातील मंत्री व पदाधिकारी विधानसभानिहाय क्षेत्रात ठाण मांडून होते. त्यांची बारीकसारीक घटनांवर नजर होती. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बसपा या पक्षामध्ये कोण कुणाचा प्रचार करीत आहे, याचा अदमासही उमेदवारांना लागू शकला नाही. आम्ही तुमचेच आहोत, असे सांगून फिटविण्याचे काम केले. (जिल्हा प्रतिनिधी)