सखींनी घेतले मॉडर्न रांगोळीचे धडे

By Admin | Updated: April 28, 2015 00:32 IST2015-04-28T00:32:44+5:302015-04-28T00:32:44+5:30

लोकमत सखी मंच, भंडारातर्फे येथील ए वन लॉन येथे उन्हाळी शिबिर अंतर्गत रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Modern Rangoli lessons learned by Sakhi | सखींनी घेतले मॉडर्न रांगोळीचे धडे

सखींनी घेतले मॉडर्न रांगोळीचे धडे

मंचचा उपक्रम : विविध प्रकारचे रांगोळीचे प्रशिक्षण
भंडारा : लोकमत सखी मंच, भंडारातर्फे येथील ए वन लॉन येथे उन्हाळी शिबिर अंतर्गत रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील सखी महिला व युवतींनी मॉडर्न रांगोळीचे लेखी व प्रात्यक्षिक धडे घेतले. शिबिरात नेचर पाण्यातली रांगोळी, बोटांची, टेन्सील, पोस्टर, फ्री हँड, रेती, भुसा, धान्य, ब्लॅक अँड व्हाईट, मॉडर्न आर्ट अशा विविध प्रकारच्या रांगोळीकरिता प्रशिक्षक कल्पना शेट्टी यांनी सखींना मागदर्शन केले व सखींना महत्वाच्या टिप्स दिल्या. जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी संचालन केले व उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली व आभार विभाग प्रतिनिधी सुहासिनी अल्लडवार यांनी मानले. सोनाली तिडके, राखी सूर, स्नेहा वरकडे, मंगला डहाके, मनिषा रक्षिये, मनिषा इंगळे, अर्चना गुर्वे व जिल्हा संयोजक ललित घाटबांधे यांनी सहकार्य केले. (मंच प्रतिनिधी)

Web Title: Modern Rangoli lessons learned by Sakhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.