शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

लाखनी तालुक्यात कामगारांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:48 IST

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कार्यान्वित असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य किटचे वाटप जोमाने सुरू आहे. सुरक्षा किटकरिता हजारो अर्ज लाखनी पंचायत समितीला प्राप्त होत आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : सुरक्षा किटकरिता लाभार्थ्यांची आर्थिक लुट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत कार्यान्वित असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत कामगारांना साहित्य किटचे वाटप जोमाने सुरू आहे. सुरक्षा किटकरिता हजारो अर्ज लाखनी पंचायत समितीला प्राप्त होत आहेत. तालुक्यात पंचायत समितीमध्ये अद्यापपर्यंत १० ते १२ हजार अर्ज जमा झाले असून त्यांची रितसर नोंदणीसुद्धा झालेली नाही. अर्जाचे अनेक गठ्ठे बेवारस पडलेले आहेत. ग्रामपंचायतस्तरावर कामगार सुरक्षा किटचे गरजू लाभार्थ्यांना वितरण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसीलदार मलिक विरानी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सुरक्षा किटमध्ये कामगारांना टिनाच्या पेटीत प्रामुख्याने हेल्मेट, टॉर्च, गमबुट, चटई, डब्बा आदी वस्तू पुरविले जात असतात. अनेक कामगार शेतीच्या हंगामात गरीब मजुरांना आपली मजुरी सोडून दुरवरच्या लाभार्थ्यांना १०० ते २०० रुपये खर्च करुन पंचायत समिति कार्यालयात जावे लागते.या साहित्य किटकरीता कामगारांना नोंदणी शुल्क २५ रुपये, मासिक वर्गणी ६० रुपये असे एकुण ८५ रुपये आकारले जातात. त्याची रितसर शासकीय पावती गट विकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रदान करण्यात येते. निवेदनात केलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील तळागळातील खºया गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही.आर्थिक दृष्टया सधन व कामगार नसलेल्या लोकांना लाभ मिळत आहे. तसेच काही विशिष्ट राजकीय पक्षातील कार्यकर्ते व शासकीय कार्यालयातील दलाल यामध्ये सक्रिय झालेले आहे.गरीब मजुरांकडून प्रती व्यक्ती ३०० ते ५०० रुपये सर्रासपणे वसूल करुन लाभार्थ्यांची पिळवणूक करीत आहेत. जिल्हा कामगार कार्यालयातून लाखनी पंचायत समितीला एक हजारच्या वर पुस्तिका प्राप्त झालेल्या आहेत. त्याची रितसर कोणतीही नोंद अथवा रेकॉर्डवर माहिती उपलब्ध नाही. येथील खासगी कॉम्प्युटर संस्थाचे मालक पैसे घेवून अर्ज वाटप करीत आहेत. त्यावर खंडविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पुस्तिका भेटत असल्याची माहिती लाभार्थ्यांनी दिली असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषीवर कडक कारवाही करावी व काळाबाजार थांबवावा अशी मागणी आहे. शिष्टमंडळात पंचायत समिती माजी सभापती दादु खोब्रागडे, माजी उपसभापती घनशाम देशमुख, पंस.सदस्य विजय कापसे, पंकज शामकुंवर यांचा समावेश होता.

कामगारांची दलालांकडून लूट थांबवावी -वासनिकस्थानिक जनकल्याण समाजोन्नती अन्याय निवारण समितीद्वारे बांधकाम मजुरांना लाभ देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत, या आशयाचे निवेदन तालुकाध्यक्ष दिनेश वासनिक यांनी तहसीलदार मल्लिक विरानी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून आहे. बांधकाम मजुरांना लाभ देण्यास पंचायत समितीचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. केवळ नावापुरते अर्ज जमा करीत आहेत. लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली काही संगणक केंद्राचे मालक ५०० ते ६०० रुपये प्रती लाभार्थी अवैधपणे वसूल करीत असल्याचे निवेदनात नमूद आहे. काही ग्रामसेवक लाभार्थ्यांच्या अर्जावर सही करण्यास लाभार्थ्यांकडून पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप वासनिक यांनी केला आहे. पंचायत समितीमध्ये अर्ज गोळा केली जातात त्याची नोंद केली जात नाही.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार