मोबाईल मनोऱ्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ

By Admin | Updated: August 7, 2014 23:47 IST2014-08-07T23:47:43+5:302014-08-07T23:47:43+5:30

मागील आठ दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहे. टॉवर उभारण्याकरिता शासकीय

Mobile towers increase the proportion of illnesses | मोबाईल मनोऱ्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ

मोबाईल मनोऱ्यामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ

भंडारा : मागील आठ दहा वर्षात मोबाईल टॉवर्सचे शहरात व ग्रामीण भागात प्रमाण वाढले आहे. मोबाईल फोनची सेवा घेण्यासाठी अनेक ठिकाणी टॉवर उभारले जात आहे. टॉवर उभारण्याकरिता शासकीय धोरणानुसार स्थानिक बेकायदेशीररित्या उभे आहे. नियमाला बगल देवूनही काही टॉवर, शाळा, कॉन्व्हेंटच्या आवारात असल्याने परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना कर्करोग स्मृतिभ्रंश यासह डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोग प्रतिबंधक शक्ती कमी होणे आदी आजार जडत आहे.
टॉवर जेवढे जास्त तेवढा नेटवर्क चांगला असे समीकरण बनले असल्यामुळे ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून टॉवर उभारत आहे. शहरामध्ये तर बरेचसे टॉवर भर वस्तीत उभारले आहे. भंडारा शहरात जवळपास २० ते २५ टॉवर असून त्याचा विपरीत परिणामही आरोग्यावर पडत आहे. ग्राहकांची संख्या वाढल्याने चांगली सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरले आहेत. याबरोबरच टॉवरची संख्याही वाढली आहे. खुल्या जागेत तसेच इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी मालकांना दरमहा २० ते २५ हजार रूपयापर्यंत भाडे मिळत असते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरूपाच्या दुष्परिणामाची पर्वा न करता टावरसाठी अनुमती दिली जाते. रहिवासी, शाळा, कॉन्व्हेंटच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. सरकारने लागू केलेल्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. टॉवरमुळे पक्षाच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अतिदाबाच्या लहरीमुळे कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरीरातील तापमानात वाढ होत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे चिमणी, कावळ्याचे अस्तित्व शहरातून नष्ट होत आहे. २०० फूट उंचीच्या टॉवर मधून निर्माण होणाऱ्या रेडिओ लहरी जमीन समांतर जातात. टॉवर मधील विद्युत चुंंबकीय लहरींचा मानवी शरीरावर परिणाम होवून कर्करोग यासह गर्भवती महिलांवरही दुष्परिणाम होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mobile towers increase the proportion of illnesses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.