वीज बिलापेक्षा मोबाईल बिलाला अधिक पसंती
By Admin | Updated: February 20, 2015 00:29 IST2015-02-20T00:29:33+5:302015-02-20T00:29:33+5:30
घरगुती वीज बिल एकवेळ उशिरा भरले जाईल; मात्र मोबाईलचे बिल प्रत्येक जण वेळेवर भरतात. कारण अलीकडे मोबाइलचा वापर इतका वाढला आहे की,

वीज बिलापेक्षा मोबाईल बिलाला अधिक पसंती
भंडारा : घरगुती वीज बिल एकवेळ उशिरा भरले जाईल; मात्र मोबाईलचे बिल प्रत्येक जण वेळेवर भरतात. कारण अलीकडे मोबाइलचा वापर इतका वाढला आहे की, मोबाईलशिवाय मनुष्य राहू शकत नाही. मध्यमवर्गीय माणूस मोबाइलवर किती खर्च करतो, मोबइलचे बिल विद्युत बिलापेक्षा कमी असते काय, कोणते बिल भरण्यासाठी नागरिक प्राधान्य देतात? या विषयावर लोकमतने शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
यामध्ये महिन्याला एक हजार रुपयापर्यंत वीज वापरणारे ४५ टक्के ग्राहक आढळून आले. तर, त्या तुलनेत एक हजार रुपयापर्यंत मोबाइलचे बिल भरणारे ५६ टक्के ग्राहक निघाले. मोबाइलवर अधिक खर्च होतो की, वीज बिलावर, असा प्रश्न शहरातील काही निवडक मध्यमवर्गीय कुटुंबांना विचारले असता, ५५ टक्के कुटुंबीयांचा मोबाइलवर होणारा खर्च हा एक हजार रुपयापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. तर ४५ टक्के ग्राहक मोबाईलपेक्षा वीज बिलाला महत्त्व देऊन नियमित वीज बिल भरतात, असे या सर्वेक्षणातून दिसून आले.
महत्व दोन्ही बिलांचे असले तरी मुलभूत सुविधा म्हणून नागरिक विजेला प्राधान्य देतात विजच नसेल तर मोबाईल चार्ज तरी कशा करावा. असा प्रतिप्रश्नही काही जणांनी विचारला. याचे उत्तर हो किंवा नाही असे मिळत असले तरी मोबाईलचे बिल विज बिलापेक्षा अधिक येत असल्याचेच निष्पन्न झाले. कुटूंबियातील प्रत्येक सदस्यांकडे मोबाईल असतो. प्रिपेड असो की पोस्टपोड बिल तर येणारच. पैसा भरावाच लागणार. त्यामुळे कुटूंबाचा मासिक बजेटवरही त्याचा परिणाम जाणवत असल्याचेही दिसून आले.
मोबाईलचे बिल दिड ते दोन हजार तर कधी हजार रुपयांचा आत येत असल्याचे असे सांगणारे बहुतांश कुटूंब आढळले. विज बिल ५०० ते ७०० रुपयांपर्यंत भरणाऱ्या कुटूंबात मोबाईलचे बिल मात्र १५०० रुपयांपर्यंत जात असल्याचेही तथ्य समोर आले. (प्रतिनिधी)