आमदार-खासदार राहूनही विकास बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:03 IST2018-01-07T00:03:16+5:302018-01-07T00:03:46+5:30
केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार जसे आहे तसे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार आले.

आमदार-खासदार राहूनही विकास बेपत्ता
आॅनलाईन लोकमत
तुमसर : केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार जसे आहे तसे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातही भाजपचे आमदार, खासदार आले. परंतु तीन ते साडेतीन वर्षाचा कालखंड लोटला तरी विकास कुठेच दिसून आला नाही. तर त्याकरिता राजकीय ईच्छाशक्ती असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले.
येथील अग्रेसन भवनात आयोजित तुमसर शहर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर आ.प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, माजी आमदार अनिल बावनकर, राजेंद्र जैन, धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, मधुकर सांभारे, विठ्ठल कहालकर, अभिषेक कारेमोरे, कल्याणी भुरे उपस्थित होते.
यावेळी पटेल म्हणाले, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात सत्ता हस्तगत केली. व आता त्यांचे सत्य बाहेर पडत आहे. शेतकºयांच्या ज्यावेळी राज्यात व केंद्रात आघाडीचे सरकार होते त्यावेळी धानाला तीन हजार रूपये भाव मिळायचा व आता त्याच धानाला दोन हजारपेक्षाही कमी भाव मिळत आहे. दोन वर्षापुर्वी नितीन गडकरी यांनी विकासाच्या नावावर जिल्ह्यात पाच हजार ५०० कोटीच्या कार्याचे भूमिपूजन केले होते. ते कामे कुठे दिसत नाही. भाजप फसवी सरकार आहे हे जनतेला कळले आहे. त्यामुळे जनताच त्यांना जागा दाखविणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार अनिल बावनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रफुल पटेल यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला. यावेळी बावनकर यांचे तुमसर, मोहाडी तालुक्यातील शेकडो समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रकाश गजभिये, अनिल बावनकर, मधुकर कुकडे, कल्याणी भुरे, अभिषेक कारेमोरे यांनी संबोधीत केले.