शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा एसडीओ हल्ला प्रकरण : २ मे पर्यंत कारवाई करावी, अन्यथा.. आमदारांनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 18:23 IST

या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेतील सहकारीच तस्करांसोबत सामिष पार्टीत सहभागी झाल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

भंडारा : उपविभागीय अधिकाऱ्यांवर रेती तस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याची आम्ही जाहीर निंदा व निषेध करीत असून, या हल्ला प्रकरणाची सखोल चौकशी करून जिल्हा पोलीस यंत्रणेतील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली.

येथील विश्रामगृहात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. भोंडेकर म्हणाले, रेती तस्करीचा विषय नवीन नाही. मात्र इमानेइतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट केले जाते. रेती तस्करांची अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. आम्ही कुठल्याही अधिकाऱ्याला व्यक्तिगत पाठिंबा देत नसून कर्तव्यनिष्ठ असणाऱ्या पदाचा सन्मान करतो. या घटनेची इत्थंभूत चौकशी करण्याची आमची एकमुखी मागणी आहे.

पूर्वीच्या घटनांचा उल्लेख करताना आ. भोंडेकर म्हणाले, पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेती तस्करांची वाढलेली मुजोरी ही चांगली बाब नाही. रेती घाटांचा लिलावही होणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेतील सहकारीच तस्करांसोबत सामिष पार्टीत सहभागी झाल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ज्या सहकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांच्याच मुखीयाला तपासी अधिकारी बनविण्यात आले आहे. यावरही आमचा आक्षेप आहे, असे आमदार भोंडेकर म्हणाले.

तीन दिवसांचा अल्टिमेटम

एसडीओंवर झालेला जीवघेणा हल्ला व त्यानंतर तस्करांसोबतच पोलीस कर्मचाऱ्यांची रंगलेली सामिष पार्टीने जिल्ह्याची मान खाली गेली आहे. परिणामी या घटनेतील जिल्हा पोलीस यंत्रणेतील दोषींवर सोमवारी म्हणजेच २ मेपर्यंत कारवाई करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही आमदार भोंडेकर यांनी दिला आहे. तीन दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMLAआमदारsandवाळूSmugglingतस्करीbhandara-acभंडारा